नागणवाडी धरणाच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:18+5:302021-02-05T06:52:18+5:30

आबिटकर म्हणाले , नागणवाडी (दिंडेवाडी - बारवे) प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाले असून, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सोमवारी (दि. १ ...

Work on Naganwadi Dam begins | नागणवाडी धरणाच्या कामास सुरुवात

नागणवाडी धरणाच्या कामास सुरुवात

आबिटकर म्हणाले , नागणवाडी (दिंडेवाडी - बारवे) प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाले असून, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सोमवारी (दि. १ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली आहे. शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे. यापूर्वी आपण अनेक वेळा बैठका घेऊन पुनर्वसन प्रश्न मार्गी लावले आहेत. आतापर्यंत साधारणतः १११ शेतकऱ्यांना देय जमिनी ऐवजी विशेष आर्थिक साहाय्य पॅकेजमधून सुमारे १६ कोटी २३ लाख रकमेचे वाटप केले आहे. ३३ शेतकऱ्यांना १७.२४ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. विशेष आर्थिक पॅकेज देण्यासाठी नव्याने सहा कोटी १४ लाख निधी मंजूर झाला आहे. या धरणामुळे दिंडेवाडी - बारवे परिसरात हरितक्रांती होणार असून, सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करून धरणाचे कामही गतीने करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले.

या पत्रकार बैठकीस धरणग्रस्त कमिटीचे अध्यक्ष योगेश पाटील, सचिव सुभाष देशपांडे , दिंडेवाडीचे सरपंच श्रीधर भोईटे, सुनीता किरोळकर, अरुण बेलेकर, माजी सरपंच प्रा.डाॅ. शहाजीराव वारके, शांताराम कांबळे, कपिल गुरव, आदी उपस्थित होते.

Web Title: Work on Naganwadi Dam begins