नाट्य, चित्रपट कलाकार असोसिएशनचे काम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:26 IST2021-03-23T04:26:07+5:302021-03-23T04:26:07+5:30

कोल्हापूर : मराठी नाट्य, चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ, मल्टिपर्पज असोसिएशनचे काम कौतुकास्पद आहे. कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे, आपण त्यांच्या सदैव ...

The work of the Drama, Film Artists Association is admirable | नाट्य, चित्रपट कलाकार असोसिएशनचे काम कौतुकास्पद

नाट्य, चित्रपट कलाकार असोसिएशनचे काम कौतुकास्पद

कोल्हापूर : मराठी नाट्य, चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ, मल्टिपर्पज असोसिएशनचे काम कौतुकास्पद आहे. कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे, आपण त्यांच्या सदैव पाठीशी आहाेत, असे मत शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केले.

शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या भरारी पथकाच्या सदस्यपदी महेश पन्हाळकर यांची तसेच पूजा शिंदे यांची शिवसेना संघटनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

मेघराज राजेभोसले यांनी महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी कोल्हापूर हे आकर्षण असून, आपल्याला या कलेचा अभिमान आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी सुजित चव्हाण, आकाराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केेले. असोसिएशनचे प्रकाश निकम, सदाशिव सूर्यवंशी, इम्तियाज बारगीर, शशिकला बुचडे, मीना कदम, संपदा मुळेकर आदी उपस्थित होते.

--

Web Title: The work of the Drama, Film Artists Association is admirable