अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:04+5:302021-02-05T06:53:04+5:30
गांधीनगर : पुणे-बंगळुरू महामार्गावरील उचगावजवळ सेवा रस्त्यावर भरधाव अज्ञात वाहनाने ॲक्टिव्हा दुचाकीला ठोकरल्याने उषा विवेक राणे (वय ३३, रा. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार
गांधीनगर : पुणे-बंगळुरू महामार्गावरील उचगावजवळ सेवा रस्त्यावर भरधाव अज्ञात वाहनाने ॲक्टिव्हा दुचाकीला ठोकरल्याने उषा विवेक राणे (वय ३३, रा. ब्लॉक नंबर ३२, म्हाडा कॉलनी, उजळाईवाडी, ता. करवीर) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री उशिरा झाला. उषा राणे रात्री तावडे हॉटेलकडून ॲक्टिव्हाने (एम एच ०९- इएच ५४१७) उचगावकडे जात होत्या. शिवनेरी हॉटेलनजीक सर्व्हिस रोड व महामार्गावर त्या आल्या असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना ठोकरले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. उषा राणे यांचा कणेरीवाडी येथे वडापावचा स्टॉल असून, त्यांना तीन लहान मुली व वयस्क आजी आहे. आईच्या जाण्याने त्या मुली पोरक्या झाल्या आहेत, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची फिर्याद भारत मारुती बागडे (रा. उचगाव) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. याबाबत गुन्हा नोंद झाला असून, पोलीस हवालदार विजय मुंदाळे तपास करत आहेत.
२९ उषा राणे डेड