ट्रकच्या धडकेत ऊसतोड महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:04+5:302021-02-05T06:52:04+5:30
कणेरी : पुणे-बंगळूर महामार्गावर कणेरीवाडीजवळील हॉटेल जयहिंदसमोर दुचाकीवरून कोल्हापूरकडे निघालेल्या ऊसतोड मजूर दाम्पल्याला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक ...

ट्रकच्या धडकेत ऊसतोड महिला ठार
कणेरी : पुणे-बंगळूर महामार्गावर कणेरीवाडीजवळील हॉटेल जयहिंदसमोर दुचाकीवरून कोल्हापूरकडे निघालेल्या ऊसतोड मजूर दाम्पल्याला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यात महिलेचा पती जखमी झाला. पल्लवी गणेश म्हस्के (वय २२, रा. बाभळगाव, ता. जि. लातूर ,सध्या रा. खेबवडे, ता. करवीर) असे मृत महिलेचे नाव आहे. पल्लवी यांची प्रकृती ठीक नसल्याने पती गणेश हे त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला घेऊन निघाले होते. कणेरीवाडीजवळी ते आले असता पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात पल्लवी यांच्या अंगावरूनच ट्रकचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. या अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलिसांत झाली आहे.