शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

गौरवशाली ‘विक्रांत’च्या प्रेमळ आठवणी पुन्हा एकदा चाळवणार!

By admin | Updated: January 13, 2015 00:10 IST

सन १९६५ व १९७१ साली पाकिस्तान लढाई व गोवा मुक्ती संग्रामात विक्रांतने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

जावेद शेख - शृंगारतळी -भारतीय नौदलाच्या गौरवशाली कामगिरीची साक्षीदार असणारी आयएनएस ‘विक्रांत’ पहिल्या विमानवाहू युध्दनौकेने देशाच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदान देऊन इतिहासात व लोकांच्या मनातही कायमचे नाव कोरून निरोप घेतला. भारतीय मनात घर केलेल्या या विक्रांतची हुबेहूब प्रतिकृती या नौकेचे एक साक्षीदार निवृत्त कॅप्टन हमीद मुकादम यांनी साकारली आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील मुलांना विक्रांत जहाज कशा स्वरूपाचे होते़ याची विस्तृत माहिती मिळावी, या हेतूने मुंबई पोर्ट ट्र्रस्टमधील डेजर विवेक नावाच्या जहाजावरील सेवानिवृत्त कॅप्टन हमीद मुकादम यांनी विक्रांतची साडेपाच फुटाची हुबेहूब प्रतिकृती बनवली आहे. प्रजासत्ताक दिनी विक्रांत येथील जिल्हा परिषद ऊर्दू शाळेला भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याचे मुकादम यांनी सांगितले़ कॅप्टन मुकादम यांनी आपल्या नोकरीच्या कारर्कीदीत विक्रांतला अगदी जवळून पाहिले आहे. जहाजाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यावर तरंगणारे हे एक प्रकारे शहरच होते. ज्यामध्ये ३० लढावू विमाने, सहा हेलिकॉप्टर्स, १६०० नौसैनिक कायमचे तैनात असायचे. सन १९६५ व १९७१ साली पाकिस्तान लढाई व गोवा मुक्ती संग्रामात विक्रांतने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. २८ नॉटिकल तासी वेग मर्यादा, २४ मेगावॅट ऊर्जेने सज्ज असणारे विक्रांत जहाज सन १९५७ साली ब्रिटनकडून खरेदी करण्यात आले. चार वर्षांनंतर विक्रांतला नौसेनेत दाखल करण्यात आले होते. मात्र, या भव्य जहाजाचे आयुर्मान घटल्याने ही युध्दनौका आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ६० करोड रूपयात भंगारात देण्यात आली.
पर्यटनदृष्ट्या जहाजाची जोपासना करण्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्याने शेवटी या ऐतिहासिक जहाजाची विल्हेवाट लावण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अनेकांनी या जहाजाचे केवळ नाव ऐकले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणी पाहिलेले नाही. विक्रांत नौका पाहणाऱ्यांंच्या डोळ्यांचे पारणे फिटावे, असे या जहाजाचे रूप होते. यामुळे लोकांना विक्रांतची कारकीर्द व इतिहास कळावा, या हेतूने मुकादम यांनी जहाजाची प्रतिकृती बनवली आहे. यापूर्वी मुकादम यांनी अंड्यांचा कुतूबमिनार शाळेला भेट दिला होता.


मुंबई पोर्ट ट्र्रस्टमधील डेजर विवेक जहाजावरील सेवानिवृत्त कॅप्टन हमीद मुकादम यांनी विक्रांतची बनवली साडेपाच फुटाची प्रतिकृती.
प्रजासत्ताक दिनी विक्रांत येथील जिल्हा परिषद ऊर्दू शाळेला भेट स्वरूपात देणार.
सन १९६५ व १९७१ साली पाकिस्तान लढाई व गोवा मुक्ती संग्रामात विक्रांतने बजावली महत्त्वाची कामगिरी.