शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार लोकांना शिक्षा करणार का..?

By admin | Updated: August 29, 2015 00:09 IST

पी. एन. यांची विचारणा : जिल्हा बँक बदली वाद

कोल्हापूर : राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातील ४० हजार लोकांनी के. पी. पाटील यांचा पराभव केला. मग त्या सगळ््यांना तुम्ही शिक्षा करणार का, अशी विचारणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांना केली. निमित्त होते जिल्हा बँकेतील बदली प्रकरणाचे. एखाद्याच्या बदलीवरून कसे राजकारण रंगते, याचेही प्रत्यंतर त्यातून आले. घडले ते असे : चेतन पोकर्णेकर हा मूळचा राधानगरीचा लिपिक जिल्हा बँकेच्या कसबा तारळे शाखेत नोकरीत आहे. गेल्या आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याने शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांचा प्रचार केल्याची तक्रार आहे. त्याचा राग माजी आमदार के. पी. पाटील यांना आला होता; परंतु त्यावेळी बँकेत प्रशासक मंडळ असल्याने त्यांना काहीच करता आले नाही. आता बँकेत संचालक मंडळ अस्तित्वात आल्याने त्यांची बदली हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे करण्यात आली. त्यांनी बदलीचा आदेश स्वीकारण्यास नकार दिल्यावर तो आदेश पोस्टाने घरी धाडण्यात आला. शेवटी कारवाईच्या भीतीने ते हलकर्णी येथे रुजू झाले. तोपर्यंत हा विषय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापर्यंतही गेला. त्यांनी आपण लक्ष घालू, असे आश्वासन दिले. जिल्हा बँकेत काँग्रेसच्या गटाचे माजी आमदार पी. एन. पाटील हे नेते आहेत. आमदार आबिटकर यांना विजयी करण्यात त्यांचाही हातभार लागला होता. त्यामुळे आबिटकर यांनी ही बाब पी. एन. यांच्या कानावर घातली. त्यांनी मग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांना फोन केला व निवडणुकीत पराभव झाला म्हणून बदली करून त्रास देणे योग्य नसल्याचे सांगितले. पराभव काय त्याने एकट्याने विरोधात काम केले म्हणून झालेला नाही. ४० हजार लोकांनी विरोधात मते दिली मग त्या सगळ््यांना शिक्षा देणार का, अशी विचारणाही पाटील यांनी ए. वाय. यांच्याकडे केली. संबंधित लिपिकाने दरम्यान बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याकडेही दाद मागितली आहे. त्यांनी ‘हजर हो, बघूया काय करायचे ते,’ असे आश्वासन दिले आहे; परंतु हा विषय बँकेत चर्चेत आहे.