शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

Maharashtra Assembly Election 2019: भाजपमुक्त कोल्हापूर; दोन्ही काँग्रेसचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 9:53 AM

Maharashtra Assembly Election 2019 भाजपमुक्त कोल्हापूर; दोन्ही काँग्रेसला चांगले यश - शिवसेनेचा सुपडासाप ....भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या कोल्हापूर जिल्हयात त्यांच्याच पक्षाचा विधानसभा निवडणुकीत सुपडासाप झाला.

ठळक मुद्देइचलकरंजीमधून प्रकाश आवाडे ३३ हजार २४६ अशा निर्णायक मतांनी पुढे आहेत.

कोल्हापूर : भाजपमुक्त कोल्हापूर; दोन्ही काँग्रेसला चांगले यश - शिवसेनेचा सुपडासाप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या कोल्हापूर जिल्हयात त्यांच्याच पक्षाचा विधानसभा निवडणुकीत सुपडासाप झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागेवर भाजपचा मोठ्या मताधिक्यांनी दारूण पराभव झाला. त्यामुळे कोल्हापूर आता भाजपमुक्त झाले आहे. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करायला निघालेल्या प्रदेशाध्यक्षांना स्वत:च्या जिल्ह्यातही भाजपला यश मिळवून देता आले नाही. या उलट दोन्ही काँग्रेसची किमान ५ जागांवर विजयी घोडदोड सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही खासदार शिवसेनेचे विजयी झाले होते. विधानसभा निवडणुकीत लोकांनी शिवसेनेलाही धोबीपछाड दिला असून लढलेल्या आठ पैकी त्यांचा एकच उमेदवार आता आघाडीवर आहे.

 

ताज्या माहितीनुसार कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचे उमेदवार चंद्रकात जाधव हे विजयी हे विजयी झाले आहेत.  त्यांनी १५ हजार ९०० मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. कोल्हापूरमध्ये जाधव यांच्या रुपाने काँग्रेसने तब्बल दहा वर्षांनी या जागेवर आपला हक्क दाखविला आहे. कोल्हापूर शहरातील शिवसेनेची हॅट्रीक न होण्याचा इतिहासही कायम राहिला आहे.

चंदगड मतदारसंघात वंचितचे अप्पी पाटील यांनी बाजी मारली आहे. पहिल्या फेरीपासूनच ते पुढे आहेत. राज्यात जिथे वंचितचे उमेदवार मागे आहेत. तिथे कोल्हापूर मधील चंदगड मतदारसंघ अपवाद ठरला आहे. अप्पी पाटील हे ८ हजार ६०९ मतांनी पुढे आहेत. लक्षवेधी लढतीमध्ये कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचे चंद्रकात जाधव हे १४ हजार मतांनी आघाडीवर दक्षिण मधून ऋतुराज पाटील हे पहिल्यापासूनच विजयाच्या मार्गावर आहेत. इचलकरंजीमधून प्रकाश आवाडे ३३ हजार २४६ अशा निर्णायक मतांनी पुढे आहेत.

 

 

कागलमध्ये धाकधुक-- दोघांचाही विजयाचा दावा... जल्लोष सुरु...विद्यमान आमदार हसन मुश्रीफ व भाजपचे बंडखोर समरजीत यांच्यात काट्याची टक्कर सुरु आहे. १८ व्या फेरीअखेर मुश्रीफ यांनी १६ हजार ३८० मतांची निर्णायक आघाडी घेतली असली तरी दोन्ही बाजूनी विजयाचा दावा करीत मतदान केंद्रासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. यामुळे येथे संभ्रमावस्था असून येथे अजूनही ८ उ फेऱ्या बाकी आहेत. यामध्ये गडहिंग्लज उत्तुरमधील ६२ हजार मतांचा समावेश आहे. या मतांवरच यांचा जय पराजय ठरलेला असून उमेदवार व कार्यकत्यांना मध्ये धाकधुक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा हायव्होलटेच मतदारसंघ असल्याने संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागून आहे.

करवीरमधून काँग्रेसचे पी. एन. पाटील हे ३ हजार मतांनी पुढे तर कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे १३ हजार ९१० मतांनी आघाडीवर आहेत. हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजूबाबा आवळे हे १५८३ मतांनी आघाडीवर आहेत. शिरोळमधून अपक्ष राजेंद्र पाटील हे १९ हजार २४९ मतांची आघाडी घेत विजयाच्या वाटेवर आहेत. राधानगरीमधून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर ५ हजार ८०० मतांनी आघाडीवर आहेत. शाहूवाडीमध्ये शिवसेनेचे सत्यजीत पाटील हे ७ हजार ५९६ मतांनी पुढे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदार संघ

कोल्हापूर उत्तर         

कोल्हापूर दक्षिण       

करवीर               

कागल         

राधानगरी             

चंदगड

शाहूवाडी 

हातकणंगले     

इचलकरंजी         

शिरोळ

 

 

 

 

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूर