शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची ही कसली मैत्री?

By admin | Updated: August 21, 2014 00:51 IST

राजू शेट्टी यांचा सवाल : कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय, महायुतीत तणाव

विश्वास पाटील - कोल्हापूर -ज्या माजी आमदारांने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास उघड विरोध केला, त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यासाठी शिवसेना पायघड्या घालत असेल तर शिवसेनेचे हे राजकारण न समजणारे आहे. शिवसेनेचा हा घटक पक्षांसोबत कसला व्यवहार आणि ही कसली मैत्री, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केला. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उद्याच्या कोल्हापूर जिल्ह्यांतील कोणत्याच कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे खासदार शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या घडामोडींमुळे महायुतीमध्ये जागावाटपाआधीच तणाव निर्माण झाला आहे.शाहूवाडी मतदारसंघातील पक्षाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या पुढाकाराने सरुड (ता.शाहूवाडी) येथे होत असलेल्या मेळाव्यासाठी ठाकरे उद्या (गुरुवारी) कोल्हापुरातयेत आहेत. सरुडकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे नेते खासदार शेट्टी यांच्याविरोधात काम केले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पाठिंबा दिला होता. त्यावरून शेट्टी व शिवसेना यांच्यात धुसफूस सुरु झाली आहे. शिवसेनेने सत्यजित पाटील यांना उमेदवारी देवू नये, अशी उघड भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे. शाहूवाडी मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेस द्यावा व त्यापक्षातर्फे विद्यमान आमदार विनय कोरे यांच्याविरोधात संघटनेचे लढाऊ नेते सदाभाऊ खोत किंवा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांना रिंगणात उतरण्याची ‘स्वाभिमानी’ची तयारी आहे.  या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी म्हणाले,‘माझ्या मतदारसंघात शिवसेना कार्यक्रम घेत असेल व आम्हांला त्याबद्दल अजिबातच विश्वासात घेतले जात नसेल तर ही गोष्ट योग्य नाही. त्याबद्दल मी आज संपर्कनेते दिवाकर रावते यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार आहे. शिवसेनेने कुणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा अधिकार आहे. परंतु ज्यांनी आम्हांला लोकसभेला थेट विरोध केला, त्यांनाच तुम्ही उमेदवारी देणार असाल तर संघटनेचे कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत. यांनी काँग्रेस सत्तेत असताना लुटमार केली तेच लोक आता काँग्रेसचे जहाज बुडायला लागल्यावर महायुतीत यायला रांग लागली आहे. अशा लोकांना घेतल्यास लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. याचा शिवसेना नेतृत्वाने विचार करावा, असा सल्लाही शेट्टी यांनी दिला आहे.