खैर तस्करीतील म्होरक्या अजून बाहेरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:49+5:302021-02-05T06:52:49+5:30

म्हासुर्लीसह गवशी आणि केलोशी परिसरात संरक्षक वनक्षेत्र असून या वनक्षेत्रात दुर्मीळ औषधी वनस्पतीसह अनेक दुर्मीळ प्राणी व पक्ष्यांचे ...

Well, the smugglers are still out | खैर तस्करीतील म्होरक्या अजून बाहेरच

खैर तस्करीतील म्होरक्या अजून बाहेरच

म्हासुर्लीसह गवशी आणि केलोशी परिसरात संरक्षक वनक्षेत्र असून या वनक्षेत्रात दुर्मीळ औषधी वनस्पतीसह अनेक दुर्मीळ प्राणी व पक्ष्यांचे वास्तव्य या जंगल परिसरात आहे. या परिसराला लागूनच गगनबावडा वन विभागाची हद्द आहे. हा सर्व परिसर दाजीपूर अभयारण्य क्षेत्राशी लागून असल्याने या वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची तस्करी होत असते. यापूर्वीही या परिसरात चोरटी वृक्षतोड, वन्यप्राण्यांच्या शिकारीची प्रकरणे, गव्यांचे संशयास्पद मृत्यू, अजगराचे मृत्यू प्रकरण, मानेवाडी येथील मोरांच्या शिकारी आदी प्रकरणे वरिष्ठांपर्यंत न पोहोचविता स्थानिक स्तरावर तडजोडीने मिटल्याने तस्करांच्या टोळ्या जोमाने काम करू लागल्या. यावरून वनविभाग अशा प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येते. खैर चोरीप्रकरणी पकडलेली टोळी हे हिमनगाचे टोक असून गेल्या सहा महिन्यांपासून या टोळीने परिसरात खैर लाकडाच्या तस्करीसाठी स्थानिकांना हाताशी धरून राखीव जंगल क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. खैरासह दुर्मीळ औषधी वनस्पती तसेच औषधी वृक्षांच्या तस्करीत ही यांचे हात गुंतले असल्याची चर्चा आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र सामसूम असल्याचा गैरफायदा घेत या टोळीने आपले बस्तान या परिसरात चांगलेच बसविले होते.

Web Title: Well, the smugglers are still out