खासगी शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यास शासन स्तरावर प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST2021-02-05T06:55:26+5:302021-02-05T06:55:26+5:30
कोल्हापूर : गेल्या ५ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदान येथे सुरू असलेल्या खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक ...

खासगी शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यास शासन स्तरावर प्रयत्न करू
कोल्हापूर : गेल्या ५ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदान येथे सुरू असलेल्या खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या ‘‘जवाब दो’’ बेमुदत आमरण उपोषणाला पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी मंगळवारी भेट देऊन पाठिंबा दिला. आंदोलनात सहभागी शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी आंदोलकांना दिली.
अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक तुकड्यांना तत्काळ निधी घोषित करणे, सेवा संरक्षणासह वैद्यकीय परिपूर्ती योजना लागू करणे, टप्पा अनुदान जाहीर करणे यांसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी मुंबईत बेमुदत आंदोलन पुकारले आहे. आमदार आसगावकर यांनी आंदोलनस्थळी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांचा पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, विनाअनुदान कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, पदाधिकारी अजित रणदिवे, इरफान अन्सारी, श्रीकांत पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
फोटो नं. ०२०२२०२१-कोल-मुंबई आंदोलन
ओळ : मुंबई येथे शिक्षक समन्वय समितीच्या बेमुदत आमरण उपोषणाला आमदार जयंत आसगावकर यांनी मंगळवारी भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी बाबासाहेब पाटील, खंडेराव जगदाळे, दत्ता पाटील, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.