शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘नकोशी’ बालके आम्ही सांभाळू

By admin | Updated: May 24, 2016 01:01 IST

मानवतेचा पुढाकार : बालकल्याण संकुलसह तीन संस्थांची ग्वाही

 कोल्हापूर : नवजात बालिकेला प्लास्टिकच्या पिशवीतून टाकणे, ही घटना अतिशय क्लेशकारक आहे. ज्या पालकांना किंवा परिस्थितीने असहाय झालेल्या महिलांना मूल नको असेल त्यांनी आपली बालके बालकल्याण संकुलला द्यावीत, असे आवाहन कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, महिला दक्षता समिती व बालकल्याण संकुलाच्यावतीने करण्यात आले आहे. पाचवी मुलगी झाल्याने शुक्रवारी नवजात बालिकेला रस्त्यावर टाकले होते. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण हेंद्रे, महिला दक्षता समितीच्या तनुजा शिपूरकर, बालकल्याण संकुलचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर व मानद सचिव पद्मजा तिवले यांनी हे आवाहन केले आहे. डॉ. हेंद्रे म्हणाले, अशा घटना घडू नयेत यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन अंतर्गत असलेल्या सर्व हॉस्पिटल, दवाखाने, लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये तसेच मेडिकलमध्येही हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अनाथ बालकांवर व अडलेल्या महिलेवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ काम करतील. याशिवाय विविध ठिकाणी व्याख्याने, पथनाट्य, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. सुरेश शिपूरकर म्हणाले, गेली अनेक वर्षे बालकल्याण संकुलातर्फे अनाथ बालकांचे संगोपन व पुनर्वसन केले जाते. तसेच अडलेल्या महिलेला विनाअट प्रवेश दिला जातो. संस्थेने आजवर २०० हून अधिक बालकांना दत्तक देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे ज्या पालकांना मूल नको असेल, त्यांनी ते रस्त्यावर किंवा उघड्यावर टाकण्याऐवजी बालकल्याण संकुलामध्ये आणून द्यावीत. रस्त्यावर बाळ टाकल्यास त्याच्या जिविताला धोका पोहोचतो. तुम्हांला बाळ नकोच असेल तर ते असे उघड्यावर टाकण्याऐवजी संस्थेत आणून द्या. त्याबध्दल गुप्तता पाळू.’यावेळी पद्मजा तिवले म्हणाल्या, संस्थेत बालकांच्या पालकांची माहिती गुप्त ठेवली जाते. मूल देऊ इच्छिणाऱ्या स्त्रीचे बाळंतपण व सांभाळ या दोन्ही गोष्टी संस्था करते. परिषदेस डॉ. संदीप पाटील, डॉ. रवींद्र शिंदे, अनुराधा मेहता, पल्लवी कोरगांवकर, राजकुमार पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मदतीसाठी आमच्याकडे या...अल्पवयीन, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, विवाहित, अविवाहित, बलात्कारित महिलांच्या पोटी मूल जन्माला आले की त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा महिलांचे महिला दक्षता समितीच्यावतीने समुपदेशन केले जाते, त्यांना आधार दिला जातो. अशा महिलांनी ९८२३१९२९६३, ९९७५५०९०७६ व ०२३१-२६२५४२९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तनुजा शिपूरकर यांनी केले.