शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

केएमटी 'जनता गाडी'च्या मार्गावर

By admin | Updated: December 16, 2014 23:49 IST

‘एसटी’च्या सेवेला खो : केएमटीला दिवसात ५० हजारांचा फायदा, सहा बसेस सुरू

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एस. टी. महामंडळास महापालिका हद्दीत प्रवासी वाहतुकीला मज्जाव केला. यानंतर एस.टी.ची जनता गाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून जोर धरू लागली. मात्र, आरटीओंच्या या निर्णयाने ‘केएमटी’ला आज, मंगळवारी एका दिवसात ५० हजारांचा फायदा झाला. प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी ‘केएमटी’नेही नव्याने सहा बसेस जनता गाडीच्या मार्गावर सुरू केल्या. तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या २५ नव्या बसेसमुळे ‘जनता’ प्रवास आणखी सुखकर व जलद होईल, अशी ग्वाही ‘केएमटी’चे व्यवस्थापक संजय भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पालिकेच्या हद्दीत नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणारी एस.टी.ची जनता गाडी बंद करावी, अशी मागणी विविध रिक्षा संघटना व ‘केएमटी’ प्रशासनाची होती. याबाबत आरटीओ लक्ष्मण दराडे यांच्याकडून एस.टी. प्रशासनाला ही सेवा बंद करण्याबाबत दीड वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू होता. तरीही एस.टी.ने जनता सेवा सुरूच ठेवली होती. अवैध जनता गाडी बंद करण्याबाबत एका बाजूला रिक्षा संघटनांची आंदोलने व ‘केएमटी’ची जोर, तर दोन रुपयांची स्वस्त जनता गाडी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी, अशा कचाट्यात सापडलेल्या आरटीओ दराडे यांनी कायद्याचा बडगा उगारत एस.टी.ची अवैध सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत प्रवाशांतून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, ही गाडी बंद झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. तसेच ‘केएमटी’ला हक्काचे उत्पन्न मिळणार आहे. (प्रतिनिधी)‘केएमटी’च्या ताफ्यात नवीन १३० बसेसची भर पडणार आहे. सर्व बसेसच्या मार्गांचे नियोजन तयार आहे. कोणत्याही मार्गावरील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागणार नाही. जनता गाडीची उणीव ‘केएमटी’ भरून काढेल. - संजय भोसले(व्यवस्थापक केएमटी)‘केएमटी’ किंवा रिक्षाने जाण्यासाठी मला जादा पैसे मोजावे लागतात. कागल-रंकाळा बसचे शहरांतर्गत थांबे बंद करताना प्रशासनाने जादा गाड्यांचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, दोन दिवसांपासून अन्य पर्यायी व्यवस्थेमुळे मोठा त्रास होत आहे. - बाळू माळी, विद्यार्थी मोटार वाहन कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या शहरात एस.टी.ला स्थानिक सेवा देण्याची परवानगी देता येत नाही. त्यामुळे नियमानुसारच जनता गाडी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. - लक्ष्मण दराडे (प्रादेशिक परिवहन अधिकारी)