शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

अवचितवाडी तलावातील पाणी संस्थेचे बांधकाम रोखले

By admin | Updated: November 20, 2015 00:06 IST

वाद चिघळण्याची शक्यता : प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ - कामगारांत हमरीतुमरी

मुरगूड : अवचितवाडी (ता. कागल) येथील उपराळा तलावामध्ये शेती गेलेल्या जमिनीमालकांच्या तोंडाला शासनाने पाने पुसली आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करून पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने गावाबाहेरील लोकांना घेऊन स्थापन केलेली पाणी संस्थाच बोगस असल्याचा आरोप करून तलावाच्या शेजारी सुरू असलेल्या पाणी संस्थेचे बांधकाम बंद पाडले. यावेळी प्रकल्पग्रस्त व बांधकाम कागमारांत हमरीतुमरीही झाली. मुरगूड शहरापासून तीन किलोमीटरवर अवचितवाडी येथे दोन वर्षांपूर्वी आठ ते दहा कोटी रुपये खर्च करून शासनाने तलाव पूर्ण केला आहे. तलावामध्ये अवचितवाडीतील चाळीस शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. यापैकी बारा शेतकरी भूमिहीन झाले आहेत. तसेच नुकसान भरपाईपासून वंचित आहेत.खोटी कागदपत्रे शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय सादर करून चिमकाई पाणी वापर संस्थेची स्थापना केल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता तलावाच्या पूर्वेला व पश्चिमेला दोन मोटार पंप हाऊसचे बांधकाम सुरू होते. ज्या जागेत बांधकाम केले जात आहे, त्या जागेच्या मालकांची परवानगीही घेतली नाही. याप्रकरणी गुरुवारी घटनास्थळी प्रकल्पग्रस्त व बांधकाम कागमारांत हमरीतुमरीही झाली. पोलीस आल्यानंतर बांधकाम बंद केले. महादेव वगदे, दत्तात्रय कारंडे, संजय आंगज, बाबूराव भारंडे, पांडुरंग भाईगडे, विमल मोरबाळे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)संस्थेची चौकशी कराचिमकाई पाणी वापर संस्थेच्या स्थापनेसाठी खोटी कागदपत्रे सादर केली असून, शेतकऱ्यांच्या मान्यतासुद्धा खोट्या आहेत. या संस्थेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तानाजी मोरबाळे यांनी केली.संस्था खासगी आहे. शासनाने मान्यता दिली आहे, पण या सस्थेच्या पंप हाऊससाठी शासकीय हद्दीमध्ये बांधकाम करण्यास आपण परवानगी नाकारली आहे. पण संस्था बांधकाम नेमके कोठे करीत आहे हे आपण पाहू. प्रकल्पग्रस्त व संस्था शासकीय अधिकारी लवकरच चर्चा करू. - आर. पी. डवरी, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर