शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत लक्ष देणार

By admin | Updated: December 11, 2015 00:48 IST

महेश मांजरेकर : चित्रनगरीला ऊर्जितावस्था देऊ

कोल्हापूर : मराठी चित्रपटांना आवश्यक त्या सुविधा शासनाकडून मिळविण्यासाठी चित्रपट दिग्दर्शक, कलाकार आदींचा दबावगट असणे गरजेचे आहे. चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून दबावगटाची निर्मिती शक्य आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत लक्ष देणार असल्याचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना सांगितले.मांजरेकर म्हणाले, मराठी चित्रपट सातासमुद्रापार गेला आहे. त्याला आणखी मोठे करणे आवश्यक आहे. शासनाकडून मराठी चित्रपटांना आवश्यक सुविधा मिळविण्यासाठी दबावगट तयार करणे आवश्यक आहे. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून शक्य आहे; पण, त्यासाठी महामंडळात दूरदृष्टी असणाऱ्या तरुण संचालकांची गरज आहे. महामंडळाचे कार्यालय मुंबई की कोल्हापूर असा वाद घालणे अयोग्य आहे. ते कोल्हापुरात असले पाहिजे. अन्य ठिकाणांपेक्षा सर्वच पातळीवर कोल्हापुरात चित्रीकरण करणे निर्मात्यांना सोयीस्कर ठरते. भविष्यात ते अधिक सोयीस्कर ठरणार आहे. कोल्हापुरच्या चित्रनगरीला ऊर्जितावस्था देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. चित्रनगरीतील विविध कामांसाठी १५ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असून, लवकरच ही कामे सुरू होतील. शासनासह चित्रनगरीसाठी या क्षेत्रातील सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांच्या टोपीकडे लक्ष दिले का?--‘नटसम्राट’ चित्रपटात नाना पाटेकर यांच्या डोक्यावर काळी टोपी असून ती एका विशिष्ट संघटनेचा प्रचार करणारी असल्याची टीका होत असल्याचे अभिनेते नाना पाटेकर व दिग्दर्शक मांजरेकर यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर महाराष्ट्रातील शेतकरीदेखील टोपी वापरतात; पण त्यांच्या टोपीचा रंग कोणता आणि कसा झाला आहे. त्यांच्या अवस्थेकडे कुणी लक्ष दिले का? असा प्रतिप्रश्न अभिनेते पाटेकर यांनी केला. मांजरेकर म्हणाले, टोपीवरून कोणत्याही व्यक्तीची विचारसरणी ठरविता येत नाही. चित्रपटनिर्मितीत दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य म्हणून नाना यांच्या डोक्यावर काळी टोपी दिसते. त्यातून कोणताही विचार, संघटनेचा प्रचार करण्याचा प्रश्नच नाही.