शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

थोरातांच्या जाचाने वरूटेंचा राजीनामा

By admin | Updated: August 24, 2014 00:41 IST

शिक्षक संघाचे राजकारण : संभाजीराव थोरात यांच्यावर निशाणा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी आज, शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा संघटनेकडे पाठविला. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांचे चोचले पुरवू शकलो नसल्याने त्यांनी जाणीवपूर्वक त्रास सुरू केला होता. या त्रासाला कंटाळून पदाचा राजीनामा देत असल्याचे वरुटे यांनी कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. वरुटे म्हणाले, मार्च २०१३ मध्ये शिक्षक संघाचा अध्यक्ष म्हणून बहुमताने राज्यातील शिक्षकांनी आपली निवड केली. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये संघटना कशी चालविली जाते याचा नमुना शिक्षकांसमोर ठेवला होता. तालुकाबाह्य प्रशासकीय बदल्या रद्द केल्या, पूर्वी प्रशासकीय बदल्यांनी बाहेर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा तालुक्यात आणले, मुख्याध्यापक पदावनतीला स्थगिती मिळविली, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी मिळण्यासाठी प्रयत्न, असे अनेक प्रश्न ग्रामविकासमंत्री जयंत पाटील व ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावू शकलो; पण ज्यांनी बारा वर्षांच्या कारकिर्दीत एकही प्रश्न मार्गी लावला नाही, त्यांना आपली अडचण होऊ लागली. त्यांनी घेतलेल्या तिन्ही अधिवेशनाचा हिशेब अद्याप दिलेला नाही. कोट्यवधी रुपये संघटनेला देणे लागत असताना संघटनाच आपले ८० लाख रुपये देणे लागते म्हणून वारंवार पैशांची मागणी संभाजीराव थोरात करत होते. हिशेब मागितला, तर लगेच हाकालपट्टीची धमकी द्यायची. जिल्हाध्यक्षांची दिशाभूल करून कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष व सरचिटणीस यांना हाताशी धरून थोरात यांनी मनमानी कारभार सुरू केला. याला विरोध करण्यास सुरुवात केल्यानंतर आपल्या विरोधात कारस्थान रचली. राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवायचे की, थोरातांचे चोचले पुरवायचे असा प्रश्न होता. त्यांनी निवडीपासून त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या पैशांची मागणी आपण पूर्ण करीत नसल्याने त्यांनी षड्यंत्र सुरू केले. त्याला कंटाळून आज राजीनामा देत आहे; पण शिक्षक संघात कायम असल्याचेही वरुटे यांनी सांगितले. यावेळी शिक्षक बॅँकेचे संचालक व सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी)