विशाल कांबळे दुसऱ्यांदा ‘पेठभाग श्री’

By Admin | Updated: December 6, 2014 00:25 IST2014-12-06T00:24:45+5:302014-12-06T00:25:36+5:30

पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत

Vishal Kamble second time 'Pethad Shree' | विशाल कांबळे दुसऱ्यांदा ‘पेठभाग श्री’

विशाल कांबळे दुसऱ्यांदा ‘पेठभाग श्री’

सांगली : पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत मिरजेच्या विशाल कांबळे याने सलग दुसऱ्या वर्षी मानाचा ‘पेठभाग श्री २०१४’ किताब पटकावून डबलबार उडवला. विशाल कांबळे, रियाज पठाण, रोहित म्हेत्रे यांच्यात तगडी लढत झाली. विशाल आणि रियाज ही तशी गुरुशिष्याची जोडी. तरीही दोघांमध्ये चुरशीचा मुकाबला झाला. अनुभवी विशालने प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत किताब पटकावला.
गजेंद्र मंडळातर्फे सराफ कट्टा येथे ही स्पर्धा पार पडली. उद्घाटन व बक्षीस वितरण आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विश्वास गवळी होते. नितीन शिंदे यांनी संयोजन केले. विजय कडणे व डॉ. सुहास व्हटकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी अशोक शेट्टी, विलास गायकवाड, कय्युम पटवेगार, शरद देशमुख, राजू गवळी, मनोहर बावचकर उपस्थित होते. पंच म्हणून रामकृष्ण चितळे, रवींद्र आरते, विश्वास चौगुले, पीयूष भाटे यांनी काम पाहिले.
(क्रीडा प्रतिनिधी)

अंतिम निकाल असा
६० किलो : विजय कुंभार, राजेसाहेब कुटवाडे, अब्दुल पेंढारी.
६० ते ६५ किलो : रोहित म्हेत्रे, वकास दुधाळ, सूरज पटेल, अनिकेत पवार.
६५ ते ७० किलो : रियाज पठाण, परशुराम साबळे, निहाल शेख, अभिजित जाधव.
७० किलोवरील : विशाल कांबळे, राहुल जाधव, अक्षय परदेशी, शिरीष सूर्यवंशी.
मोस्ट इम्प्रुव्हड : विजय कुंभार
बेस्ट पोझर : रोहित शिंदे.

 

Web Title: Vishal Kamble second time 'Pethad Shree'