शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

विनय काेरे यांच्या नावाचा समावेश, तर शिंत्रेंची हरकत फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीत ज्योतिर्लिंग कडधान्य खरेदी-विक्री संघाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विनय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीत ज्योतिर्लिंग कडधान्य खरेदी-विक्री संघाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विनय कोरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. आजरा साखर कारखाना प्रतिनिधी म्हणून प्रक्रिया गटात समावेश करावा, म्हणून कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांची हरकत फेटाळण्यात आली. दुबार २३ संस्थांमध्ये गगनबावडा तालुक्यातील तानूबाई विकास शेळोशी व आजरा तालुक्यातील कर्पेवाडी विकास संस्थेच्या प्रतिनिधींच्या नावांचे ठरावच रद्द करण्यात आले.

जिल्हा बँकेच्या चार गटांतील २१ जागांसाठी सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये ३ सप्टेंबरला चार गटांतील ७६४७ संस्था सभासदांची यादी विभागीय सहनिबंधक कार्यालयाने प्रसिध्द केली हाेती. यावर १३ सप्टेंबरपर्यंत हरकती घेण्यात आल्या. या कालावधीत विविध गटांत ११८ हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी सुनावणी घेतली. हरकतींमध्ये २३ दुबार ठराव दाखल झाले होते, त्यामध्ये २१ संस्था प्रतिनिधींमध्ये समझोता होऊन एकाने माघार घेतली, तर दोन संस्थांनी ठरावावर दावा केल्याने तानूबाई विकास शेळोशी व कर्पेवाडी विकास, कर्पेवाडी व हेरवाड येथील आदित्य शेतीमाल संस्थेचा ठराव रद्द करण्यात आला.

यादी जिल्हा बँकेकडे दिली असून, हरकत कोणाची नाही, मात्र बँकेच्या निदर्शनास काही त्रुटी आल्यास त्यांच्या पातळीवर बदल करून उद्या, शुक्रवारपर्यंत विभागीय सहनिबंधकांकडे सादर करायची आहे.

माले येथील ज्योतिर्लिंग खरेदी-विक्री संघाचा अवसायक आदेश रद्द केल्याने यादीत समावेश करावा, अशी हरकत विनय काेरे यांनी घेतली होती. ती मान्य करण्यात आली. आजरा साखर कारखान्याने थकबाकी भरल्याने प्रतिनिधीचा समावेश करावा, अशी हरकत सुनील शिंत्रे यांनी घेतली होती. मात्र विहीत वेळेत थकबाकी न भरल्याने त्यांची हरकत फेटाळण्यात आली. विकास संस्था गटात दोन संस्थांचे ठराव रद्द केल्याने १८६४ सभासद राहिले. प्रक्रियामध्ये एक संस्था कमी झाली आणि एक वाढल्याने तेवढीच संख्या राहिली. इतर संस्था गटात दोन संस्था कमी झाल्या आहेत.

अशी होईल अंतिम यादी

गट एकूण मतदार

१ १८६४

२ ४४९

३ १२२१

४ ४११३

सोमवारी अंतिम यादी

जिल्हा बँकेच्या प्रारूप यादीवरील हरकती व सुनावणी प्रक्रिया संपली असून, या निकालावर आता सहकार न्यायालयात अपील करता येणार आहे. सोमवारी (दि. २७) अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार असून, त्यानंतर दहा दिवसांत प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.

१० ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल?

साधारणत: अंतिम यादीनंतर ३२ ते ३५ दिवसांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे १० ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन, ७ नोव्हेंबरला मतदान होण्याची शक्यता आहे.