शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या पाण्यासाठी सीमाभागातील गावे तहानलेली

By admin | Updated: May 7, 2015 00:19 IST

शेतकऱ्यांतून संताप : निकृष्ट दर्जाचे काम; सहा वर्षांपासून एकदाही पाणी नाही, सरकारने कोट्यवधी रुपये खर्चूनही उपयोग नाही

राजेंद्र हजारे - निपाणी --सीमाभागातील शेतकऱ्यांना पाटबंधारे खात्यातर्फे कालव्यांद्वारे पाणी देण्याची योजना सरकारने राबविली. निढोरी कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे ४,५४१ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. त्यासाठी बेनाडी, शिवापूरवाडी, आप्पाचीवाडी, सौंदलगा, कुर्ली गावांमध्ये २००८साली कालव्यांचे काम पूर्ण झाले. परंतु, सहा वर्षांपासून एकदाही कालव्यात पाणी आले नाही. बांधकाम निकृष्ट झाल्यानेच कालव्याच्या पाण्यासाठी सीमाभागातील गावे आसुसलेली आहेत.कागल तालुक्यातील चिखली बंधाऱ्यातून वेदगंगा नदी तिरावरील हदनाळ, म्हाकवे, आप्पाचीवाडी, भाट नांगनूर, कुर्ली, सौंदलगा, आडी, बेनाडी, कन्नूरपर्यंत २५ किलोमीटर अंतराचा निढोरी शाखा कालवा आहे. त्यासाठी चिकोडी तालुक्यातील २१ किलोमीटर, तर कागल तालुक्यातील म्हाकवे गावातून ४ किलोमीटरचा कालवा तयार झाला. त्याची खोली आठ फुटांवर ठेवण्यात आली असून, गरजेनुसार त्याची उंची कमी-जास्त करण्यात आली आहे. कालव्यासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये देण्यात येणार होते, पण भरपाईची रक्कम अजून बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही.मुख्य कालव्याबरोबर १२ उपकालव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. वेदगंगा नदीला जोडणारे उपकालवे निर्माण केल्याने अतिरिक्त पाणी वाया न जाता नदीद्वारे पुढील शेतकऱ्यांना मिळण्याची योजनासुद्धा आखली आहे. हदनाळ येथे १.२६ कि.मी., म्हाकवे ४ कि.मी. भाटनांगनूर-आप्पाचीवाडी ६, कुर्ली ४, कुर्ली-सौंदलगा ३, सौंदलगा ५, आडी आणि बेनाडी प्रत्येकी ३ कि.मी., बेनाडी ते शिवापूरवाडीपर्यंत १३ कि.मी.चा उपकालवा तयार आहे. अनेक ठिकाणी कालव्याला भगदाड पडले आहे, तर काही ठिकाणी कालव्यांच्या भिंती कोसळल्या आहेत. सहा वर्षांतून एकदाही पाणी न आल्याने पिचिंगमधून झाडे-झुडपे उगवली आहेत. सरकारने कोट्यवधी रुपये खर्चूनही कालव्यांच्या पाण्यापासून शेतकरी अलिप्तच आहेत. त्यामुळे शासनाचा निधी पूर्णपणे वाया गेला आहे. यापूर्वी निढोरी कालव्यातून म्हाकवेपर्यंत पाणी पोहोचले होते, पण त्याचा वेग आणि दाब कमी होत गेल्याने कुर्ली, सौंदलगापर्यंतच पाणी आले. मात्र, बेनाडी, आडी, कन्नूर भागापर्यंत ते पाणीच कधीच पोहोचले नाही. परिणामी, माळभागातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.कालव्यांच्या निर्मितीनंतर दोनवेळा पाण्याची चाचणी घेतली; पण पाणी पुढे सरकण्यासाठी योग्य त्या उपाययोजना झाल्या नाहीत. केवळ पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळेच कालवे ओस पडले आहेत.- रायगोंडा पाटील, शेतकरी, बेनाडी.