शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

खेड-भरणेत भुयारी मार्गाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:08 IST

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान भरणेनाका येथील जंक्शनवर निर्माण होणारी वाहतुकीची संभाव्य अडचण दूर करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने भुयारी मार्गाचे काम सुरु केले आहे. तीन पोकलेन मशीन्स, दोन जेसीबी आणि तीन वाहने दिवस-रात्र काम करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देखेड - भरणेत भुयारी मार्गाचे काम सुरूदोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती

खेड : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान भरणेनाका येथील जंक्शनवर निर्माण होणारी वाहतुकीची संभाव्य अडचण दूर करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने भुयारी मार्गाचे काम सुरु केले आहे. तीन पोकलेन मशीन्स, दोन जेसीबी आणि तीन वाहने दिवस-रात्र काम करताना दिसत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा ते आंबवली मार्गावरील साई-रिसॉर्ट हॉटेल या दरम्यान भुयारी मार्ग तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आंबवली आणि दापोलीकडे जाणाऱ्या वाहनांचा मार्ग मोकळा झाला आहे. चौपदरीकरणाच्या कामात सुरूवातीपासूनच अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये महामार्गासाठी संपादीत करण्यात आलेल्या जागेमध्ये असलेली बांधकामे ही मुख्य अडचण होती.महामार्ग रुंदीकरणाच्या आड येणारी बांधकामे संबधित मालकाने स्वत:हून रिकामी करून द्यावीत, अशी सूचना महामार्ग विभागाकडून करण्यात आली होती. काही व्यावसायिकांनी या सूचनेचे पालन केले. मात्र, काहींनी या सूचना धुडकावल्याने ही बांधकामे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करावी लागली. आता तर चौपदरीकरणाला अडथळा ठरणाऱ्या बांधकामांशी संबंधित असणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्याची तंबीच दिली आहे. तसे फलकही लावण्यात आले आहेत. भरणे नाका परिसरात महामार्ग चौपदरीकरणासाठी सपाटीकरणाचे काम सुरु आहे.कर्मचारी नियुक्तचौपदरीकरणाचे सपाटीकरण आणि भुयारी मार्ग यामुळे या जंक्शनवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे चालकांची फसगत होत असल्याने चिपळूणला जाणारा चालक दापोलीकडे, तर दापोलीकडे जाणारा चालक आपले वाहन चिपळूणकडे घेऊन जात आहे. चालकांची होणारी फसगत लक्षात आल्यानंतर योग्य पर्यायी मार्गाबाबत चालकांना माहिती देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे चालकांची होणारी फसगत थांबली आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी