दौलतनगरात युवकाकडून वाहनांची मोडतोड, सराईत गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:32 PM2020-05-26T18:32:32+5:302020-05-26T18:35:51+5:30

राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील दौलतनगर परिसरामध्ये सोमवारी रात्री उशिरा काही युवकांनी प्रचंड दहशत माजवली. या युवकांनी हातात तलवार, लोखंडी गज आणि दगडांच्या साहाय्याने सुमारे २० ते २२ वाहनांना लक्ष्य करून त्यांची तोडफोड केली. या हल्ल्यात चारचाकी, दुचाकी, रिक्षा या वाहनांची प्रचंड तोडफोड केली. परिसरात सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता.

Vehicle wreckage by youth in Daulatnagar, a form of terror | दौलतनगरात युवकाकडून वाहनांची मोडतोड, सराईत गुन्हेगारास अटक

दौलतनगरात युवकाकडून वाहनांची मोडतोड, सराईत गुन्हेगारास अटक

Next
ठळक मुद्देदौलतनगरात युवकाकडून वाहनांची मोडतोड, दहशतीचा प्रकार सराईत गुन्हेगारास अटक; २१ वाहनांचे नुकसान

कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील दौलतनगर परिसरामध्ये सोमवारी रात्री उशिरा काही युवकांनी प्रचंड दहशत माजवली. या युवकांनी हातात तलवार, लोखंडी गज आणि दगडांच्या साहाय्याने सुमारे २० ते २२ वाहनांना लक्ष्य करून त्यांची तोडफोड केली. या हल्ल्यात चारचाकी, दुचाकी, रिक्षा या वाहनांची प्रचंड तोडफोड केली. परिसरात सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता.

हल्लेखोरांनी माजवलेल्या दहशतीनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी याप्रकरणी संशयितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. पोलिसांनी मंगळवारी रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप उर्फ चिन्या अजित हळदकर (वय १९, रा. दौलतनगर) याला पाठलाग करून पकडले. याचबरोबर संशयित हल्लेखोरांचाही पोलीस शोध घेत आहेत.

रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप उर्फ चिन्या अजित हळदकर याला गुन्हेशोध पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून दौलतनगर परिसरात पकडले. त्यासोबतच दोन संशयितांना देखील ताब्यात घेतले आहे. मंगळवारी दिवसभर संशयित हल्लेखोरांची धरपकड सुरू होती.

 

Web Title: Vehicle wreckage by youth in Daulatnagar, a form of terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.