शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १८६१ जणांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन महानगरपालिकेची यंत्रणा आता अधिक सक्रिय झाली असून गुड फ्रायडेची सुट्टी असतानाही आरोग्य ...

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन महानगरपालिकेची यंत्रणा आता अधिक सक्रिय झाली असून गुड फ्रायडेची सुट्टी असतानाही आरोग्य विभागाचे कर्मचारी शुक्रवारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात

व्यस्त होती. शुक्रवारी दिवसभरात शहरातील १,८६१ व्यक्तींवर लसीकरण करण्यात आले. नागरिकांचाही या लसीकरणास मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आणि लसीकरण करण्यावर महापालिका आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्यामुळे महापालिकेची काही पथके शहरात फिरत होती. लाऊडस्पीकर लावलेल्या वाहनातून लोकांनी गर्दी करू नये, शारीरिक अंतर ठेवून व्यवहार करावे, असे आवाहन करत फिरत होती. मुख्य बाजारपेठ, दुकान लाईन येथे या पथकांचे विशेष लक्ष होते.

बिंदू चौक, मिरजक तिकटी, लक्ष्मीपुरी, पापाची तिकटी या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. केंद्र सरकारने शहरातील सात ठिकाणे ही हॉटस्पॉट ठरणार असल्याची पूर्वकल्पना दिली आहे. त्यामुळे या

सात ठिकाणावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. कोरोनाचे रुग्ण आता कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच शहरातही वाढत आहेत. रोज साधारणपणे ४० ते ४५ रुग्ण नव्याने कोरोना बाधित होत आहेत. त्यामुळे शहरात स्वॅब घेण्याचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. शुक्रवारी ८५१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले.

अकरा नागरी आरोग्य केंद्रे व १८ खासगी रुग्णालयात दिवसभरात १,८६१ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण सुरू आहे. लसीकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन ती सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली आहे.

आयसोलेशन रुग्णालयात सकाळी तर महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत सायंकाळी कोरोनासंबंधीच्या उपायोजनाबाबत आढावा बैठक झाली. मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्यासह काही वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.