अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST2021-09-27T04:27:14+5:302021-09-27T04:27:14+5:30

बेळगाव येथील अंगडी कॉलेजमध्ये सुरेश अंगडी यांच्या प्रथम स्मृतिदिनी अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर ते बोलत होते. बेळगाव धारवाड ...

Unveiling of the statue of Angadi | अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण

बेळगाव येथील अंगडी कॉलेजमध्ये सुरेश अंगडी यांच्या प्रथम स्मृतिदिनी अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर ते बोलत होते. बेळगाव धारवाड नवीन रेल्वेमार्ग पूर्णत्वास राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, हा रेल्वे मार्ग पूर्ण करणे हे अंगडी यांचे स्वप्न होते ते पूर्ण होईल, असा विश्वास बोम्मई यांनी व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री जगदीश शेट्टर, मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार प्रभाकर कोरे, प्रकाश हुक्केरी, माजी मंत्री लक्ष्मण सवदी, महंतेश कवठगिमठ आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री बोम्मई आणि प्रदेश भाजप अध्यक्ष नलिन कटील यांनी महावीर भवन येथे भाजपच्या नूतन 35 नगरसेवकांचा सत्कार केला. यावेळी मनपा निवडणुकीत 35 नगरसेवक निवडून आणण्यात योगदान दिलेल्या आमदार आणि पालकमंत्री यांचे तोंडभरून कौतुक केलं.

२६ बेळगाव

फोटो : बेळगाव येथील अंगडी कॉलेजमध्ये दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई.

Web Title: Unveiling of the statue of Angadi