माई ह्युंडाई मध्ये ‘नव्या आय २० एन लाईन’चे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:23 IST2021-09-03T04:23:58+5:302021-09-03T04:23:58+5:30

कोल्हापूर : ह्युंडाई मोटर्सच्या वतीने गुरुवारी येथील माई ह्युडाईच्या शोरूममध्ये ‘आय २० एन लाईन’ या नव्या मालिकेतील नवीन ...

Unveiling of the new i20N line at My Hyundai | माई ह्युंडाई मध्ये ‘नव्या आय २० एन लाईन’चे अनावरण

माई ह्युंडाई मध्ये ‘नव्या आय २० एन लाईन’चे अनावरण

कोल्हापूर : ह्युंडाई मोटर्सच्या वतीने गुरुवारी येथील माई ह्युडाईच्या शोरूममध्ये ‘आय २० एन लाईन’ या नव्या मालिकेतील नवीन कारचे अनावरण झाले. आय २० एन लाईन आता एन ६ आणि एन ८ या दोन प्रकारात उपलब्ध होणार आहे. एक लिटर टर्बो जीडीआय हे अत्याधुनिक पेट्रोल इंजिन या दोन्ही मॉडेल्समध्ये वापरण्यात आलं आहे. युवा वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून अनेक आकर्षक रंगांमध्ये ही स्पाेर्टी कार लॉन्च करण्यात आली आहे.

या दोन्ही मॉडेल्समध्ये २७ प्रकारच्या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे नवीन स्पोर्टी आय २० एन लाईन चालवताना ग्राहकांना एक वेगळा अनुभव येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ही कार कोल्हापुरात फक्त माई ह्युंडाईच्या शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे. बुकिंगसाठी ग्राहकांनी माई ह्युंडाईच्या शोरूमला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक तेज घाटगे यांनी केले आहे. अनावरण प्रसंगी माई ह्युंडाईचे संचालक दिग्विजय राजेभोसले, सरव्यवस्थापक विशाल वडेर, महेश गेज्जी, सुनील खांडेकर उपस्थित होते.

०२०९२०२१ कोल ह्युंडाई

कोल्हापुरातील माई ह्युंडाई शोरूममध्ये गुरुवारी नवीन स्पोर्टी आय २० एन लाईनचे गौरव सप्रे व सौ.सप्रे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी माई ह्युंडाईचे संचालक दिग्विजय राजेभोसले, महेश गेज्जी, सुनील खांडेकर उपस्थित होते.

Web Title: Unveiling of the new i20N line at My Hyundai