इस्पुर्ली येथे पाटील-चहाण गटाचा एकतर्फी विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:31+5:302021-01-20T04:25:31+5:30
पाटील गटाने गेल्या पंधरा ते वीस वर्षांची विजयाची परंपरा कायम ठेवली. येथील नऊ जागांसाठी इर्षेने आणि अटीतटीने मतदान झाले ...

इस्पुर्ली येथे पाटील-चहाण गटाचा एकतर्फी विजय
पाटील गटाने गेल्या पंधरा ते वीस वर्षांची विजयाची परंपरा कायम ठेवली. येथील नऊ जागांसाठी इर्षेने आणि अटीतटीने मतदान झाले होते. हनुमान शेतकरी विकास आघाडी पॅनलमध्ये एकनाथ पाटील गटाच्या सहा जागा आणि चेतन चव्हाण गटाच्या तीन, अशा मिळून नऊ जागांसाठी उमेदवार उभे केले होते. त्यातील राजाराम गोंविद चौगले हे बिनविरोध निवडून आले. उर्वरित आठ जागांसाठी अटीतटीची लढत झाली. विरोधी दळवी पॅनलने आपल्या सात जागा व एक अपक्ष पुरस्कृत मिळून लढत दिली. विजयी आघाडीचे नेतृत्व एकनाथ पाटील, गजानन पाटील, विलास चौगले, चेतन चव्हाण, सुनील चुयेकर, निवास शेटे, शंकर मगइम यांनी केले. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : राजाराम सदाशिव पाटील, शुभांगी संजय पोर्लेकर, मेघा चेतन चव्हाण, जयश्री आनंदा चिंदगे, सरदार कृष्णात चुयेकर, सुमन ज्ञानदेव गुरव, संजय चंद्रकांत कांबळे, मनीषा मानसिंग कांबळे, अपक्ष राजाराम गोंविद चौगले.