शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कायद्यातील बदल, सुधारणा समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:21 IST

कोल्हापूर : देशातील विविध कामगार कायद्यांपैकी काही कायद्यांमध्ये केंद्र शासनाने बदल आणि सुधारणा केल्या आहेत. त्या कारखानदार, उद्योजकांनी ...

कोल्हापूर : देशातील विविध कामगार कायद्यांपैकी काही कायद्यांमध्ये केंद्र शासनाने बदल आणि सुधारणा केल्या आहेत. त्या कारखानदार, उद्योजकांनी समजून घ्यावेत, असे आवाहन ॲड. अभय नेवगी यांनी शनिवारी येथे केले.

येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, स्मॅक, गोशिमा, आयआयएफ, कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्रीज, सीआयआय, मॅक-कागल यांच्यावतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहातील चर्चासत्रामध्ये ॲड. नेवगी यांनी कारखानदार, उद्योजकांना पाॅवरपाॅइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. राज्य सरकारने या कामगार कायद्यातील बदल स्वीकारलेले नाहीत. त्याबाबत उद्योजक, कारखानदारांच्या काही सूचना, मते, समस्या असतील, तर त्यांनी त्या नोंदवाव्यात, असे आवाहन ॲड. नेवगी यांनी केले. ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ ॲण्ड वर्किंग कंडशिन कोड २०२०, सोशल सिक्युरिटी कोड २०२०, तसेच कोड ऑन वेजेस २०१९ आदी नवीन कायद्यांची त्यांनी माहिती दिली. उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. यावेळी श्रीकांत पोतनीस, एम. वाय. पाटील, प्रताप पुराणिक, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, बाबासाहेब कोंडेकर, सोहन शिरगावकर, आर. बी. थोरात, कुशल सामाणी, राजेंद्र डुणुंग, किरण चरणे, संजय पाटील, मोहन पंडितराव आदी उपस्थित होते. सचिन शिरगावकर यांनी प्रास्ताविक केले. इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित शाह यांनी स्वागत केले. सचिव दिनेश बुधले यांनी आभार मानले.

चौकट

इंडस्ट्रीय रेलेशन कोड अस्तित्वात

मिनिमम वेजिस ॲक्ट (१९४८), पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट (१९६५), पेमेंट ऑफ वेजिस ॲक्ट (१०३६) या कायद्यांच्या एकत्रीकरणातून इंडस्ट्रीय रेलेशन कोड २०२० अस्तित्वात आला आहे. इंडस्ट्रीयल एम्लॉईमेंट स्टॅण्डिंग ऑर्डर ॲक्ट (१९४६), इंडस्ट्रीयल डिस्प्युट ॲक्ट (१९४७), ट्रेड युनिटन ॲक्ट (१९२६) हे तिन्ही कायदे एकत्र केले असल्याचे ॲड. नेवगी यांनी सांगितले.

फोटो (१४०२२०२१-कोल-कामगार चर्चासत्र) : कोल्हापुरात शनिवारी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात उद्योजकांच्या विविध संघटनांनी संयुक्तपणे आयोजित कामगार कायद्याबाबतच्या चर्चासत्रात ॲड. अभय नेवगी यांनी मार्गदर्शन केले.