शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत लाथाळ्याने मंत्रिपद हुकल

By admin | Updated: December 5, 2014 23:31 IST

कोल्हापूरला ठेंगाच : सेनेतील ‘राजकारणा’नेच क्षीरसागर यांचा पत्ता कटे

राजाराम लोंढे -कोल्हापूर -विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात शिवसेनेला सर्वांत चांगले यश हे कोल्हापूर जिल्ह्यात मिळाल्याने मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळेल, अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना पक्षप्रमुखांनी ठेंगा दाखविला असला तरी त्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राजेश क्षीरसागर यांचे मंत्रिपद निश्चितच होते. परंतु, शिवसेनेंतर्गत राजकारणाचा फटका व ऐनवेळी कोकणातून दीपक केसरकर यांचे नाव निश्चित झाल्याने क्षीरसागर यांचे राज्यमंत्रिपद निसटले. शिवसेनेला भरघोस यश दिले म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरला येऊन महालक्ष्मीचा नवस फेडला. परंतु, सत्तेची संधी देताना मात्र त्यांनी हात आखडता घेतल्याची भावना त्यामुळे व्यक्त झाली. क्षीरसागर यांना राज्यमंत्रिपद दिल्यास ते डोईजड होतील, अशी भीती ज्यांना वाटली, त्यांच्याकडून मंत्रिपद मिळू नये, यासाठी सर्व पातळ्यांवर ताकद पणाला लावल्याची चर्चा आहे.विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ६० टक्के यश देणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेला यश मिळाल्याने मंत्रिमंडळात कोल्हापूरला कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळणार, अशी अटकळ होती. मंत्रिपदासाठी राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके व सुजित मिणचेकर हे स्पर्धेत होते. ‘शिवसेनेचा कडवा संघटक’ म्हणून क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने त्यांचे नाव निश्चित झाले होते. चंद्रदीप नरके यांनीही मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. ‘मागासवर्गीय चेहरा’ म्हणून संधी मिळेल, असे डॉ. सुजित मिणचेकर यांना वाटत होते. मात्र, शिवसेना सत्तेत सहभागी होणार, हे निश्चित झाल्यापासून क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर होते. क्षीरसागर यांना लॉटरी लागणार म्हटल्यावर शिवसेनेंतर्गत राजकारणाने उसळी घेतली. त्यातूनच त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत तक्रार केल्याची चर्चा आज, शुक्रवारी जिल्ह्यात सुरू होती.पुन्हा वेटिंग...भाजप-शिवसेनेचे मनोमिलन झाले, त्याचदिवशी माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे निधन झाले. त्यामुळे शपथविधी लांबणीवर पडला. त्याचाही फटका क्षीरसागर यांना बसला. शिवसेनेला १२ मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यातील दहाजणांचा आज शपथविधी झाला. शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागा रिक्तआहेत. त्यामध्ये सहभागाच्या कोल्हापूरकरांना आशा आहेत; पण आता मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होणार, हेही महत्त्वाचे आहे. हाविस्तार होण्यास काही महिने जातील. शिवसेनेने सध्या ज्यांना संधी दिली आहे, त्यात मागासवर्गीय नेतृत्व फारसे कुणी नाही. त्यामुळे तो निकष लागला तर आमदार मिणचेकर यांचे नाव पुढे सरकते. तोच क्षीरसागर यांना जास्त धोका आहे. फटाके, डिजिटलची तयारीगेले आठ दिवस प्रसारमाध्यमांमधून क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर होते. कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका चौकात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सवही साजरा केला होता. उत्साही कार्यकर्त्यांनी स्वत:च खातेवाटप करून नगरविकास राज्यमंत्री म्हणून व्हॉट्स अ‍ॅपवरून मेसेज फिरविले; त्यांच्या विरोधकांनी त्याची माहिती ‘मातोश्री’वर पोहोच केल्याचे समजते.