शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: May 13, 2015 21:25 IST

इचलकरंजी नगरपालिका : सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे यांना शह देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची स्थापना

इचलकरंजी : नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या बंडामुळे विरोधी पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात आले. आणि नगरपालिकेत निर्माण झालेल्या विचित्र स्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजप व कॉँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचा उदय झाला आहे. या आघाडीबाबत दोन्ही पक्षांकडील गोटात अस्वस्थता आहे.साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशी आघाडी सत्तेवर आली. त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून शहर विकास आघाडीने प्रभावी काम केले. ५७ नगरसेवक असलेल्या नगरपालिकेत दोन्ही कॉँग्रेसचे ४० नगरसेवक असले तरी ‘शविआ’च्या १७ नगरसेवकांनी सत्तारूढ आघाडीच्या कामकाजावर वचक ठेवला होता.जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नगराध्यक्षा बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन बंड केले. त्यांना ‘शविआ’ ने व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. त्यावेळेपासून ‘शविआ’ चे प्रमुख सागर चाळके यांनी पालिकेची सूत्रे हाती घेतली. कॉँग्रेसमध्ये माजी नगरसेवक सतीश डाळ्या यांना मानणारा एक गट आहे. त्यामुळे चाळके यांनी डाळ्या गटाशीही संधान बांधले.नगरपालिकेमध्ये कॉँग्रेसमधील काही नाराज नगरसेवकांचा गट आहे. असा कॉँग्रेसमधील नगरसेवकांचा गट, शहर विकास आघाडीतील भाजप वगळता अन्य नगरसेवकांचा गट, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील कारंडे व जांभळे हे दोन्ही गट आणि काही मातब्बर अपक्ष यांची आवळ्या-भोपळ्यांची मोट चाळके बांधत आहेत. त्यातून निर्माण झालेली तिसरी आघाडी आमदार सुरेश हाळवणकर व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना शह देण्यास तयार झाली आहे. (प्रतिनिधी)आवाडेंना कंटाळले, तर हाळवणकरांकडून अपेक्षाभंगनगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत तिसऱ्या आघाडीला निश्चितपणे चांगले यश मिळेल, असे मत आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांनी व्यक्त केले. कारण इचलकरंजीची जनता आवाडेंना कंटाळली आहे. आणि आमदार हाळवणकर यांनी, तर अपेक्षाभंग केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.गळाला कोणते मासे, याचीच चर्चातिसऱ्या आघाडीबाबत माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, तिसरी आघाडी होत असेल, तर आनंद आहे. याबाबत भाजपकडून अद्याप तरी काही प्रतिक्रिया नोंदविण्यात आलेली नाही. तरीही कॉँग्रेस व भाजपमध्ये राजकीय पातळीवर अस्वस्थता आहे. चाळके यांच्या गळाला कोणते मासे लागलेत, याचीच येथील राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा आहे.