शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मुश्रीफ यांच्या सल्ल्यानेच विधानसभेला उद्धवसेनेत, माजी आमदार के.पी. पाटलांनी केला गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:23 IST

राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘के.पीं’ची फटकेबाजी : पक्षाच्या वर्धापनदिनाला ५ हजार कार्यकर्ते जाणार

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत अडचण आल्याने थोडा बाजूला गेलो होतो, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसशी अतूट नाते आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशाच्या आपण बाहेर नाही, त्यांच्या सल्ल्यानेच उद्धवसेनेत गेल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार के.पी. पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिन मंगळवारी (दि. १०) पुण्यात बालेवाडी स्टेडियमला होत आहे. त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते.

के.पी. पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारखे वादळ जिल्ह्यात आहे. हिमालयासारखे ते नेते आहेत, पण ते केवळ मोठे होऊन चालणार नाही, छोट्या छाेट्या कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. आपण सत्तेत आहोत, आमच्या हक्काचा व सन्मानाचा वाटा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागा, महायुतीचा झेंडा फडकवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल राहण्यासाठी प्रयत्न करूया. पक्षाच्या वर्धापनदिनाला जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा सत्कार पक्षाच्यावतीने करण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, रणजीतसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, जिल्हा बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आदिल फरास, मधुकर जांभळे आदी उपस्थित होते. शीतल फराकटे यांनी आभार मानले.

शड्डू ठोकून तयारच

एका अपयशाने खचून जायचे नाही, मी सहा निवडणुका लढवल्या. दोन वेळा विजयी झालो, तरीही ९० हजार मताचा गठ्ठा कायम आहे. भाजपने दोन खासदारांच्या बळावर देशात सत्ता मिळवली, त्यामुळे डगमगून जाऊ नका. अजित पवार व हसन मुश्रीफ हे आमच्या आई आहेत, त्यामुळे कोण वाटेल ते अंगावर येऊ दे, आम्ही शड्डू ठोकून तयारच असल्याचे के.पी. पाटील यांनी सांगितले.

‘नविद’नी जादू करावी..

आम्ही सगळ्यांनी एकवाक्यतेने ‘नविद’ यांच्यावर ‘गोकुळ’ अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. निवडणुकीला वर्ष राहिले आहे, त्यांनी वर्षात अशी जादू करावी की पुन्हा संघाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यावी, त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागूया, असे आवाहनही के.पी. पाटील यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK P. Patilके. पी. पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना