रजपूतवाडीनजीक दोन टेम्पोची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:00+5:302021-04-27T04:26:00+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावर रजपूतवाडी (ता. करवीर) येथे भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन टेम्पोची समोरासमोर धडक होऊन ...

Two tempos collided head-on near Rajputwadi | रजपूतवाडीनजीक दोन टेम्पोची समोरासमोर धडक

रजपूतवाडीनजीक दोन टेम्पोची समोरासमोर धडक

कोल्हापूर : कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावर रजपूतवाडी (ता. करवीर) येथे भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन टेम्पोची समोरासमोर धडक होऊन चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. जितेंद्र जालिंदर कुंभार (वय ३९, रा. बच्चे सावर्डे, ता. पन्हाळा) असे गंभीर जखमी चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी जितेंद्र कुंभार हे आपल्या ताब्यातील टेम्पो घेऊन कोल्हापूर ते पन्हाळा भरधाव वेगाने चुकीच्या बाजूने जात होते. यावेळी मनोज भगवान मोरे (३३, रा. आंबवडे, ता. पन्हाळा) हे आपला टेम्पो घेऊन कोल्हापूरच्या दिशेने येत होते. त्याचवेळी रजपूतवाडीजवळ जाधव बाबा मंदिरनजीक दोन्हींही टेम्पोंची समोरासमोर धडक झाली. यामध्ये जितेंद्र कुंभार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात दोन्हीही टेम्पोच्या दर्शनी बाजूचे मोठे नुकसान झाले. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Two tempos collided head-on near Rajputwadi