माकडाच्या हल्ल्यात दोघे जखमी

By Admin | Updated: July 7, 2015 01:20 IST2015-07-07T01:20:40+5:302015-07-07T01:20:40+5:30

सीपीआरमध्ये उपचार सुरू

Two injured in Monkey attack | माकडाच्या हल्ल्यात दोघे जखमी

माकडाच्या हल्ल्यात दोघे जखमी

कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील केशकर्तनालयात आलेल्या संजय सिंगारे माने (वय ४० रा. केर्ली, ता. करवीर) यांच्या हाताचा माकडाने चावा घेतल्याने रक्तबंबाळ झाले. हा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. राजापूरमध्ये ते डॉक्टर आहेत.
दोन दिवसांपासून शहरातील शनिवार पेठ, उत्तरेश्वर पेठ व शुक्रवार पेठ परिसरात पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घातला आहे. सलग दुसऱ्या दिवशी केशकर्तनालयामध्ये जाऊन हल्ला केला. दुकानात माकड शिरल्याने केशकर्तनालयाचे मालक सम्राट चव्हाण यांच्यासह नोकर भयभीत झाले व ते बाहेर आले. नागरिक बाहेर आल्यावर माकड उत्तरेश्वर पेठेकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पळत सुटले. सकाळी शुक्रवार पेठेतीलच एका ज्वेलर्समध्येही हेच माकड गेले होते, खोलखंडोबा तालीम परिसरात रविवारी याच माकडाने सतीश चौगुले या तरुणावर केशकर्तनालयामध्ये जाऊन हल्ला केला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 

Web Title: Two injured in Monkey attack