शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपक्षांचे अर्ज दाखल

By admin | Updated: September 23, 2014 23:02 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी मंगळवारी नगर शहर व श्रीगोंदा मतदारसंघातून प्रत्येकी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले़

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी मंगळवारी नगर शहर व श्रीगोंदा मतदारसंघातून प्रत्येकी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले़ आघाडी व महायुतीचा घोळ सुरू असल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी अद्याप अर्ज दाखल केले नाही़मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर संग्राम जगताप व मनसेचे स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांच्यासाठी अर्ज घेण्यात आले आहेत़ त्यामुळे शहरात आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत़ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ तीन दिवसांपासून शहरासह ही प्रक्रिया सुरू आहे़ परंतु पहिल्या दोन दिवसांत कर्जत-जामखेड मतदारसंघातून अपक्ष एक अर्ज दाखल झाला़ आघाडी व महायुतीचा घोळ सुरूच असल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी अर्ज दाखल करणे टाळले आहे़ त्यात अर्ज दाखल करण्यास सध्या मुहूर्तही नाही़ त्यामुळे पितृ पंधरवाडा संपल्यानंतरच अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असे बोलले जात आहे़ असे असले तरी अपक्ष अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे़ सोमवारी कर्जत येथून पहिला अपक्ष अर्ज दाखल झाला़ नगर शहर मतदारसंघातून अपक्ष अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे़ सामाजिक कार्यकर्ते हेमंत ढगे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे़ श्रीगोंदा मतदारसंघातून सचिन पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला़ उर्वरित दहा मतदारसंघातून एकही अर्ज दाखल झाला नसून, नगर शहर मतदारसंघातून ९ जणांनी १५ नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत़ त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस उशिरा का होईना, पण सुरुवात झाली आहे़ आघाडी व युतीचा निर्णय होऊन घटस्थापनेनंतर चारही प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून अर्ज दाखल केले जातील़ निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास शेवटचे चार दिवस राहिले आहेत़ गत तीन दिवसांत अवघे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़ दाखल झालेले अर्ज अपक्षांचे आहेत़ नगर शहरासह श्रीगोंदा आणि कर्जत- जामखेडमधून हे अर्ज दाखल झाले आहेत़ उर्वरित ९ मतदारसंघात सध्या तरी शांतता आहे़ परंतु या मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे़ येत्या चार दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांचे अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत़ (प्रतिनिधी)