शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या दोघा कामगारांचे अपहरण करून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

कोल्हापूर : स्कार्पीओ गाडीला महापालिकेचा डंपर घासल्याचे निमित्त पुढे करत अनोळखी पाच जणांनी डंपरचालक व वाहकाला जबरदस्तीने गाडीत घालून ...

कोल्हापूर : स्कार्पीओ गाडीला महापालिकेचा डंपर घासल्याचे निमित्त पुढे करत अनोळखी पाच जणांनी डंपरचालक व वाहकाला जबरदस्तीने गाडीत घालून टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथे नेऊन त्यांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हल्ल्यात डंपरचालक तात्यासाहेब यशवंत लोंढे (वय ४९ रा. भोई गल्ली, सी वॉर्ड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर), सुनील रघुनाथ जगदाळे (रा. लक्ष्मीपुरी) हे दोघे महापालिकेचे कामगार जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी कसबा बावडा संकपाळ नगरात घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात स्कार्पीओतील अनोळखी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी महापालिकेचा डंपर कसबा बावडाकडे जात होता, त्यावेळी संकपाळ नगर परिसरात एक स्कार्पीओ गाडी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात डंपरला घासली. संतप्त स्कार्पीओचालकाने गाडी पुढे नेऊन डंपरच्या आडवी थांबवली. गाडीतील पाच जणांनी उतरुन डंपरचालक लोंढे व जगदाळे या दोघांना शिवीगाळ करून जबरदस्तीने स्कार्पीओ गाडीत बसवले. ती भगवा चौकातून न्यायालयपर्यंत गेली, त्यानंतर पुन्हा स्कार्पीओ गाडी वळवून कसबा बावडा, शिये टोल नाकामार्गे क्रशर चौक, टोप संभापूर येथे नेले. तेथे दोघा कामगारांना दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गाडीतील जगदाळे यांना स्कार्पीओ गाडीतून रस्त्याकडेला खाली ढकलून त्यांना दगडाने मारहाण केली. यामध्ये तोंडावर, पाठीत, डोक्यात दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर लोंढे यांनाही मारहाण केली.

घटनेनंतर भेदरलेल्या दोघांनी मित्रांना फोन करून बोलवून घेतले. याबाबत तात्यासाहेब लोंढे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी पाच जणांवर गुन्हा नोंदविला आहे. त्या पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सहा. पो. नि. सागर पाटील व पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे करीत आहेत.

पळून जाणाऱ्याचा केला पाठलाग, लुटले

सहकारी जगदाळे यांना मारहाण करत असल्याचे पाहून तात्यासाहेब लोंढे हे पळून जात होते. त्यांचा पाठलाग करून त्यांना जबरदस्तीने पकडून पुन्हा स्कार्पीओ गाडीत बसवले. पुढे नेऊन त्यांना पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोबाइल संच, खिशातील १२०० रुपये असा सुमारे ३३०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर त्यांना गाडीतून खाली ढकलून भरधाव वेगाने पुढे निघून गेले.