भुरट्या चोऱ्या करणाऱ्या दोघांना अटक, राजेंद्रनगरातील चोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:42 IST2020-07-06T18:41:27+5:302020-07-06T18:42:33+5:30

भुरट्या चोऱ्या करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. संदीप बुद्धीसिंग रजपूत (वय २९) आणि श्रीनाथ लेमन लोंढे (३२, दोघे, रा. कांजारभाट वसाहत, राजेंद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Two burglars arrested, burglary in Rajendranagar revealed | भुरट्या चोऱ्या करणाऱ्या दोघांना अटक, राजेंद्रनगरातील चोरी उघड

भुरट्या चोऱ्या करणाऱ्या दोघांना अटक, राजेंद्रनगरातील चोरी उघड

ठळक मुद्देभुरट्या चोऱ्या करणाऱ्या दोघांना अटक, राजेंद्रनगरातील चोरी उघड १७ हजारांचा चोरीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : भुरट्या चोऱ्या करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. संदीप बुद्धीसिंग रजपूत (वय २९) आणि श्रीनाथ लेमन लोंढे (३२, दोघे, रा. कांजारभाट वसाहत, राजेंद्रनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ जूनला राजेंद्रनगर शिंदे वखारीजवळील गिरीश कल्लोजीराव शिंदे यांच्या घराच्या आवारातील सायकल, सोफा यांसह अन्य काही वस्तू चोरीला गेल्या होत्या. याबाबत त्यांनी राजारामपुरी पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी संदीप रजपूत आणि श्रीनाथ लोंढे या दोघांना सोमवारी अटक केली.

त्यांच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा सोफा, पाच हजार रुपयांची गिअरची सायकल, एक हजार रुपये किमतीची दोन लोखंडी पाण्याची मीटर असा सुमारे १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांनी आणखी किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत, त्याचाही तपास पोलीस करीत आहेत.


 

Web Title: Two burglars arrested, burglary in Rajendranagar revealed