Kolhapur Crime: दुबई टूर महागात पडली; ७ लाख भरले, ५० हजारच हातात पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:44 IST2025-08-14T18:44:16+5:302025-08-14T18:44:56+5:30

एकास अटक, दोघांविरोधात गुन्हा दाखल : टूर्स एजन्सीकडून फसवणूक

Two booked for cheating by taking Rs 7 lakh for Dubai trip one arrested in kolhapur | Kolhapur Crime: दुबई टूर महागात पडली; ७ लाख भरले, ५० हजारच हातात पडले

Kolhapur Crime: दुबई टूर महागात पडली; ७ लाख भरले, ५० हजारच हातात पडले

कोल्हापूर : दुबई सहलीसाठी सात लाख १० हजार रूपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. भाऊराव त्र्यंबक घोलप (मूळ गाव नाशिक, सध्या रा. साबळेवाडी, ता. करवीर), चंद्रकला जयवंत नेरकर, अशी संशयितांची नावे आहेत. घोलप यास पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या संशयित महिलेचा शोध पोलिस घेत आहेत. या दोघांनी भारतीय चलन घेऊन दुबईतील करन्सी दिरम कमी देऊन फसवणूक केल्याची नोंद पोलिसांत आहे.

पोलिस फिर्यादीत म्हटले आहे की, महिपती पुंडलिक पाटील (वय ५९, रा. साळुंखे पार्क, कळंबा, कोल्हापूर), रवी श्रीनिवाय नायडू ( रा. उजळाईवाडी, कळंबा, कोल्हापूर), शशिकांत मारुती पाटील ( रा. सुर्वेनगर, कोल्हापूर) हे तिघेही शासनाच्या जलसंपदा विभागातून निवृत्त आहेत. यांना दुबईला सहलीसाठी जायचे होते. यामुळे ते मित्राच्या ओळखीने बसस्थानक परिसरातून टूर्स अँड ट्रॅव्हन्सचे एजन्सी चालवणारे घोलप यांची भेट घेतली. त्यांच्याकडे पाटील यांच्यासह या तिघांनी १७ ते २३ जानेवारी २०२४ अखेर टप्प्याटप्प्याने सात लाख १० हजार रुपये घेतले. दुबईला सहलीसाठी नेलेही. महिपती यांच्याकडून भारतीय चलनानुसार पहिल्या टप्प्यात दोन लाख घेतले. 

प्रत्यक्षात ११०० दिरम (दुबई करन्सी) म्हणजे २५ हजार रुपये दिले. उर्वरित १ लाख ७५ हजार रुपये दिले नाहीत. नायडू यांच्याकडून ३ लाख १५ हजार रुपये घेऊन प्रत्यक्षात ११०० दिरम म्हणजे भारतीय चलनानुसार २५ हजार रुपयेच दिले. उर्वरित १ लाख ४५ हजार रुपये न देता फसवणूक केली. तिसरे सहकारी शशिकांत यांच्याकडून १ लाख २० हजार रूपये घेतले. मात्र, घोलप आणि नेरकर यांनी संगनमत करून परत दिले नाहीत. 

पैसे देण्यास नकार

देय असलेल्या पैशाच्या मागणीसाठी तिघेही घोलप, नेरकर यांच्याकडे पाठपुरावा करीत राहिले; पण त्यांनी पैसे दिले नाहीत. यामुळे महिपती यांनी मंगळवारी शाहूपुरी पोलिसांत या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Two booked for cheating by taking Rs 7 lakh for Dubai trip one arrested in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.