शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: प्रेमप्रकरणातून झालेल्या गोळीबारप्रकरणी इचलकरंजीतून दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:04 IST

चार दिवस पोलिस कोठडी

इचलकरंजी : एका प्रेमप्रकरणाच्या वादातून ओंकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक सांगलवाडी) याच्यावर इचलकरंजीत गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. दोघांना न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली.

अनुराग अमोल सूर्यवंशी (२०, रा. शिकलगार हाऊस पुजारी मळा) व ओमकार संजय शेंडे (रा. यशवंत कॉलनी) अशी दोघांची नावे आहेत. त्यांना शहरातील पंचगंगा नदीघाट परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कौस्तुब निखिल गोंधळे (२०, रा. सिद्धार्थ परिसर सांगली) याने फिर्याद दिली आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी कबुली दिली आहे. त्यामध्ये दुचाकीवरून ओंकार कांबळे व कौस्तुभ गोंधळे हे दोघे जयसिंगपूरकडे निघाले होते. 

सांगली रोडवरील शिक्षक पतसंस्थेजवळ दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांपैकी पाठीमागे बसलेल्या अनुराग सूर्यवंशी व ओमकार शेंडगे यांनी कांबळे याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. त्यामध्ये एक गोळी ओंकार याच्या बरगडी आणि पोटामध्ये घुसल्याने तो जखमी झाला. जखमी कांबळे याच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना अनुराग व ओमकार हे दोघेही संशयित पंचगंगा नदी रेणुका मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांना तेथून ताब्यात घेतले. त्यांना गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश चव्हाण करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Crime: Two arrested in Ichalkaranji shooting over love affair.

Web Summary : Two arrested in Ichalkaranji for shooting Omkar Kamble over a love affair dispute. The victim was shot on Sangli Road and is currently hospitalized in Kolhapur. Police investigation is ongoing.