रिक्षात बसताच मोजावे लागणार बावीस रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:42 PM2021-04-07T18:42:21+5:302021-04-07T18:44:09+5:30

RtoOffice Kolhapur- प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने पेट्रोल, डिझेल दरवाढ व रिक्षाचालकांची मागणीचा विचार करून नव्या भाडेवाढीस मंजूरी दिली आहे. त्यानूसार २० ऐवजी २२ रूपये पहिल्या स्टेजला म्हणजेच रिक्षात बसताच २२ रूपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. या नव्या दरवाढीची अंमलबजावणी १ मे २०२१ पासून केली जाणार आहे.

Twenty two rupees will have to be paid while sitting in the rickshaw | रिक्षात बसताच मोजावे लागणार बावीस रुपये

रिक्षात बसताच मोजावे लागणार बावीस रुपये

Next
ठळक मुद्देरिक्षात बसताच मोजावे लागणार बावीस रुपये एक मे पासून लागू होणार नवे दर

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने पेट्रोल, डिझेल दरवाढ व रिक्षाचालकांची मागणीचा विचार करून नव्या भाडेवाढीस मंजूरी दिली आहे. त्यानूसार २० ऐवजी २२ रूपये पहिल्या स्टेजला म्हणजेच रिक्षात बसताच २२ रूपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. या नव्या दरवाढीची अंमलबजावणी १ मे २०२१ पासून केली जाणार आहे.

याबाबत प्राधिकरणची बैठक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांच्या उपस्थित झाली. या बैठकीत सर्व बाबींचा विचार करून हकीम समितीच्या शिफारशीनुसार वाहनाची किंमत, घसारा, कर, विमा, दुरूस्ती देखभाल खर्च, महागाई निर्देशांक, इंधन खर्च या सर्व बाबींचा विचार करून रिक्षाचे सुरूवातीचे किमान भाडे २० वरून २२ व पुढील प्रति कि. मी. भाडे १७ वरून १८ रूपये भाडेवाड करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहीती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.

नवीन दर लागू करण्यासाठी मीटर कॅलिब्रेशन करून घेणे गरजेचे आहे. मीटर कॅलीब्रेशन करण्यासाठी १८० दिवसांची म्हणजेच दि. ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात येत आहे. मीटर कॅलीब्रेशन केलेल्या ऑटोरिक्षाधारकांसाठी नवीन दर १ मे २०२१ पासून लागू होतील. रात्री १२ ते पहाटे पाचवाजेपर्यंत दीडपट भाडे आकारण्यात येईल. या नियमांचे रिक्षाचालकांनी काटेकोर पालन करावे. असेही प्राधिकरण तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Twenty two rupees will have to be paid while sitting in the rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.