शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बारवे ते भुदरगड रस्ता लवकर पूर्ण करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:43 IST

पांगिरे : गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या बार्वे ते ...

पांगिरे : गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या बार्वे ते भुदरगड या रस्त्याबाबत या भुदरगड प्रतिष्ठानने नेहमीच आंदोलन केले. याबाबत लोकप्रतिनिधी, वनविभाग, बांधकाम विभाग यांची भेट घेतली होती. २००० हून अधिक लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. याबाबत मा. जि. प. सदस्य अर्जुन आबिटकर सर यांनी सर्व ग्रामस्थ यांच्यासमोर वन विभाग व बांधकाम विभागच्या संबंधित अधिकारी वर्गाला चांगलेच धारेवर धरले. १० फेब्रुवारीच्या तारखेपर्यंत काम सुरू करण्यास संगितले. तसेच वन विभागाचे प्रलंबित अडथळे दूर करण्यास सांगितले. भुदरगड प्रतिष्ठानने या भागासाठी नेहमी चांगले सामजिक कार्य केले असून, त्यांनी हे सुरू केलेल्या आंदोलनामुळे आजचा हा रस्ता पाहणीचा दौरा आयोजित करण्यात आला. हा रस्ता लवकर पूर्ण नाही झाला तर मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अध्यक्ष दयानंद भोईटे व अशोक गुरव यांच्यावतीने देण्यात आला. या प्रतिष्ठानच्या मागणीला दाद देताना आज या रस्त्याची पाहणी करण्यासाठी मा. जि. प. सदस्य अर्जुन आबिटकर, वनक्षेत्रपाल आहिरे आणि त्यांचे पदाधिकारी, बांधकाम विभागाचे कुंभार व सातपुते, जकिनपेठचे सरपंच संभाजी नलगे, अरुण बेलेकर, मल्हार फौंडेशनचे संजय पौळकर, बार्वे गावचे सर्व नूतन ग्रा. पं.सदस्य, भांडेबांबर गावचे उपसरपंच भीमराव रेडेकर, राजू भारमाल, विद्याधर परीट, ज्येष्ठ नेते रामभाऊ शिउडकर, पत्रकार सचिन बेलेकर, संजय खोचारे, भुदरगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे, उपाध्यक्ष व उपसरपंच अशोक गुरव, प्रवीण भोईटे, अजित कदम, विशाल भोईटे व भागातील सर्व प्रमुख मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.