शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग अडचणीत

By admin | Updated: June 11, 2015 00:20 IST

द्विधा मन:स्थिती : मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांकडून आश्वासनांची पूर्तता नाही

सतीश पाटील- शिरोली -राज्य शासन वीज दरात सध्या कोणतीही सवलत देण्याच्या मन:स्थितीत नाही. तसेच कर्नाटकमध्ये सध्या पुरेशी वीज उपलब्ध नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांची स्थलांतराबाबत द्विधा मन:स्थिती आहे. भाजपचे कोल्हापूरमध्ये राज्य अधिवेशन झाले. अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगराज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील आणि इतर मंत्री उपस्थित होते.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा येथील उद्योजकांनी वीज दरवाढीबाबत चार महिन्यांपूर्वी आंदोलन छेडले होते. उद्योजक बेमुदत उद्योग बंद ठेवणार होते; पण शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी वीज दरवाढीबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करून दरवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मोडीत काढले. याला सहा महिने उलटले; पण वीज दरवाढीबाबत निर्णय झाला नाही. कोल्हापुरातील अधिवेशनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ऊर्जामंत्री, उद्योगराज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील हे तीन दिवस शहरात होते; पण त्यांनी उद्योजकांना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. मंत्री पोटे-पाटील यांनीच जिल्ह्यातील सर्व उद्योजकांच्या समस्या, अडचणी समजून घेण्यासाठी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत गोशिमाच्या सभागृहात बैठक आयोजित केली होती. यावेळी उद्योजकांनी आपल्या जुन्याच समस्या, गाऱ्हाणी पुन्हा मांडल्या. मंत्र्यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिले आणि पत्रकार परिषदेत मंत्री पोटे-पाटील यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन आहे, वीज बाहेरून विकत घेतली जात आहे आणि सध्या तरी उद्योगांना वीज दरात सवलत देता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले. महाराष्ट्रात वीज महाग असल्याने उद्योजक शेजारच्या कर्नाटक राज्यात जाणार म्हणून गेल्या तीन वर्षांपासून धिंडोरा पिटत आहेत. कर्नाटक शासनानेही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. महामार्गाला लागूनच तवंदी घाटाच्या पूर्वेकडील बाजूच्या तवंदी-कणंगला येथील सुमारे आठशे पन्नास एकर जमिनीचे भूसंपादन करण्यास सुरुवात केली आहे; पण कर्नाटकचे माजी उद्योगमंत्री मृरगेश निराणी हे चार दिवसांपूर्वी कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी सध्या कर्नाटकमधील सरकार उद्योजकांना मुबलक वीजपुरवठा उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि कोल्हापूरच्या उद्योजकांना कोणती वीज देणार, असे सांगितले.त्यामुळे महाराष्ट्रातही उद्योजकांना वीज स्वस्त मिळू शकत नाही आणि कर्नाटकमध्ये वीज उपलब्ध नाही. त्यामुळे कोल्हापूरचे उद्योजक कारखाने बंद ठेवू शकत नाहीत आणि स्थलांतरितही होऊ शकत नाही, अशा दुहेरी कात्रीत सापडले आहेत.महाराष्ट्रात वीज महाग आहे. शासन याबाबत कोणताही निर्णय घेत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग अडचणीत सापडले आहेत, तरीही स्थानिक लोकप्रतिनिधींना आमच्याकडे बघायला वेळच नाही. त्यामुळे भविष्यात उद्योग परराज्यांत जातील.- अजित आजरी, अध्यक्ष गोशिमा गेल्या तीन वर्षांपासून उद्योगांना मोठी मंदी आहे. उद्योग जिवंत राहायचे असतील तर सरकारने जैतापूर वीज प्रकल्प सुरू होईपर्यंत किमान विजेवर अनुदान तरी द्यावे, तरच उद्योग जगतील. - राजू पाटील, उपाध्यक्ष स्मॅक