शिरोली येथे जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:29 IST2021-09-04T04:29:02+5:302021-09-04T04:29:02+5:30

शिरोली : शिरोली येथील वनराई फाउंडेशनतर्फे जिल्हा परिषदेच्या शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. कुमार विद्या मंदिर, उर्दू विद्या मंदिर या ...

Tree planting at Zilla Parishad School at Shiroli | शिरोली येथे जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

शिरोली येथे जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

शिरोली :

शिरोली येथील वनराई फाउंडेशनतर्फे जिल्हा परिषदेच्या शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. कुमार विद्या मंदिर, उर्दू विद्या मंदिर या शाळांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

वनराई फाउंडेशन हा शिरोली येथील युवकांचा ग्रुप असून त्यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

शिरोलीमधील जिल्हा परिषद तसेच खासगी माध्यमिक शाळांच्या आवारात श्रमदान करून वृक्षारोपण केले. या ग्रुपने सर्व देशी वृक्ष लावले असून यात चिंच, मोरावळा, पिंपळ, करंज, जांभूळ, सावर, हिरडा आदी उपयुक्त देशी वृक्षांचे रोपण केले आहे. यात अमित पाटील, तानाजी भोसले, शशिकांत भोसले, अक्षय महेंद्रकर, रतन औताडे, ऋषभ औताडे, अक्षय पाटील, अजय पाटील, श्रीकांत संकपाळ, नितीन पाटील, प्रशांत भोसले आदी सहभागी झाले होते. कुमार विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापिका संगीता भरमगोंडा, पौलस चौगुले, कृष्णात पाटील उपस्थित होते.

फोटो ओळी :-

शाळेच्या आवारात वृक्षारोपण करताना वनराई फाउंडेशनच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Tree planting at Zilla Parishad School at Shiroli