शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चार रुग्णालयांत उपचार कक्ष

By admin | Updated: February 26, 2015 00:22 IST

आरोग्य विभाग सतर्क; बारा संशयित रुग्ण बरे

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लू आजाराची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. पेठवडगाव येथील गर्भवती महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. बारा संशयित रुग्णांना डिस्चार्ज केले आहे. पाच रुग्णांचा स्वाब तपासणीसाठी पाठविले आहे. त्यामुळे शासनाचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यातील चार शासकीय रुग्णालयांत स्वतंत्र उपचारकक्ष सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. जी. आडसूळकर यांनी मंगळवारी ‘सीपीआर’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.डॉ. आडसूळकर म्हणाले, पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक या भागांत स्वाईन फ्लूची साथ आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही काही प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी, अतिसार अशी सर्वसाधारण लक्षणे आहेत. हे लक्षणे दिसताच संबंधितांनी जवळच्या डॉक्टरांकडून निदान करून घ्यावे. प्रामुख्याने स्वाईनची लागण झालेला रुग्ण खोकल्यास, शिंकल्यास विषाणूंच्या माध्यमातून होत असते. लागण झाल्यापासून सात दिवसांपर्यंत दुसऱ्याला संसर्ग होत असतो. त्यामुळे स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णाने इतर व्यक्तींशी जवळीकता टाळावी, शाळा, रस्ते, कार्यालयास जाऊ नये, साबण, अल्कोलबेस हँडवॉश लिक्विडने हात धुवावेत, शिंक, खोकला आल्यास रुमालाचा वापर करावा, वेळेवर उपचार व औषधे घ्यावीत. फेसमास्क, टॅमी फ्ल्यू औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध केला आहे. परराज्य व परदेशांतून येणाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. ज्या गावांत स्वाईन फ्लूचे रुग्ण मिळत आहेत, तेथे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्यसेविका यांचे जिल्हास्तरीय नियंत्रण पथक त्वरीत दाखल होत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्ह्णातील ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत आरोग्य शिक्षण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)कक्ष कोठे ?गडहिंग्लज, कोडोली, गांधीनगर, कसबा बावडा येथे शासनाच्या रुग्णालयांत स्वतंत्र उपचार कक्ष स्थापन सुरू करण्यात आला आहेत. लक्षणे जाणवलेल्या रुग्णांंनी संबंधित रुग्णालयांत उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. आडसूळकर यांनी केले. पेठवडगावमध्ये संशयित शोधमोहीमपेठवडगाव : येथील प्राथमिक शिक्षिका प्रमिला पाटील यांचा स्वाईन फ्लूने बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरात यादव कॉलनीतील ३९ कुटुंबांतील सुमारे १४६ नागरिकांचा सर्व्हे केला. तसेच संपूर्ण शहरात प्रबोधन करणारी पत्रके वाटण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत इंदिरा वसाहत, सहारा चौक, गोसावी, डवरी वसाहत ते हजारे कोपरा असा ७०० घरांचा सर्व्हे सुरू होता. यामध्ये कोणीही संशयित रुग्ण मिळून आला नाही. मात्र, पाटील यांच्या शेजारी राहणाऱ्या तिघांना सर्दी झाली आहे. शहरात अन्य कोणाला स्वाईन फ्लूची लक्षणे नसल्याचे सर्व्हेअंती स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी घाबरू नये, पालिका प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, आरोग्य अधिकारी नूतन पोरे यांनी दिली. प्रमिला पाटील यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे समजताच डॉ. साळी यांनी तळसंदे, वडगाव, लाटवडे येथे परिसराची पाहणी केली.