गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक; दोघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:15+5:302021-02-05T06:53:15+5:30
इचलकरंजी : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे दुचाकीवरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोघांना रंगेहात ...

गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक; दोघांना पकडले
इचलकरंजी : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे दुचाकीवरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून दारू व दोन मोटारसायकली असा एकूण एक लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संकेत बाळासाहेब बंडगर (वय २३) व चेतन सर्जेराव बंडगर (१९, दोघे रा. शिरटी, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक अब्दुललाट येथे वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी वरील दोघेजण दुचाकीवरून गोवा बनावटीची दारूची वाहतूक करताना आढळले. ही कारवाई शुल्क विभागाचे निरीक्षक पांडुरंग पाटील, वर्षा पाटील, राहुल गुरव, जी. एच. हजारे, विजय माने, सुभाष कोले, विलास पवार यांनी केली.