शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपसंचालक कार्यालयात बदल्यांचा बाजार, पाचजणांची टोळी कार्यरत : राज्यमंत्री यड्रावकर यांनी घेतली दखल; चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार होत असून, प्रत्येक पदानुसार दर काढल्याची ...

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार होत असून, प्रत्येक पदानुसार दर काढल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील तीन मंत्र्यांच्या शिफारस पत्रालाही केराची टोपली दाखविली जात आहे. या कार्यालयांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येत असून, यात मंजूर पदसंख्या ३९१४ असून, त्यापैकी २५९२ भरली असून, १३२२ पदे रिक्त आहेत. या देव-घेवीची दखल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर व आरोग्य संचालकांनीही घेतली आहे. त्याच्या चौकशीचे आदेश दिले जातील, असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. परिचारिका संघटनेने ही बाब राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली असून, त्यात गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे.

गतवर्षी कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या बदल्या करण्याचे काम सध्या सुरू असून, यामध्ये प्रत्येक पदासाठी दर ठरले होते. त्यानुसार ज्यांनी ठरलेले पैसे दिले त्यांच्याच बदल्यांचे प्रस्ताव करून ऑर्डर काढण्यात आल्या आहेत. यासाठी ही साखळी कार्यालयातील मुख्य प्रशासकीय ‘भवना’पासून सुरू होते. शिशापासून बिडाच्या भाल्यापर्यंत चार ते पाच जणांची यंत्रणा कामाला लागते. ऑर्डर येण्याअगोदरच पैशासाठी या यंत्रणेचा तगादा सुरू होतो. चष्मेवालाही त्यात सहभागी असतो, असे सांगण्यात येते.

चालक, शिपाई, क्लार्क, टेक्निशियन पदासाठी ४० ते ७० हजार त्याचबरोबर नर्सेस बदल्या व पदोन्नतीसाठी ७० ते ७५ हजार, अशी मागणी होत असल्याचे कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. याच यंत्रणेकडून विनंती बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील मंत्र्यांचे शिफारस पत्र आणायला सांगितले. मात्र, त्या पत्राला केराची टोपली दाखवत ठरल्याप्रमाणे दर काढून वसुली केल्याचे समजते. जे कर्मचारी पैसे देण्यासाठी तयार झाले, त्यांचेच प्रस्ताव तयार करून आरोग्य संचालकांना सादर करून त्यावर सह्या घेऊन ऑर्डर काढण्यात आल्या. पुण्यात सही झाल्याबरोबर दुसऱ्या मिनिटापासून कोल्हापुरातील यंत्रणा वसुलीला लागली.

अजून पदोन्नती शिल्लक...

या बदल्यांनंतर कार्यालयांतर्गत शिपाई ते कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ लिपिक ते सहायक अधीक्षक ते अधीक्षक अशी पदोन्नती शिल्लक असून, यात शिपाई ते कनिष्ठ लिपिकसाठी शहरात हवे असल्यास जास्त रक्कम मागण्यात येत असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

कोट...

आरोग्य उपसंचालक कार्यालयांतील भावना चौधरी, शशिकांत सणगर, गौरव भोसले, हुसेन भाले व लोखंडे यांच्या साखळीबाबत माझ्याकडेही लेखी तक्रारी आल्या असून, त्यांच्या चौकशीचे आदेश देणार आहे.

- राजेंद्र यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

कोट..

आरोग्य उपसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या साखळीची चौकशी त्याच विभागातील अधिकाऱ्यांमार्फत न होता त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून व्हावी. इतरही कार्यालयांतील अशी चौकशी त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून झाली पाहिजे.- अनिल लवेकर, सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना