वाहतूक नियम आपल्या सुरक्षेसाठी आहेत, त्याचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:11+5:302021-02-05T06:53:11+5:30

हुपरी : दररोज होणारे विविध प्रकारचे रस्ते अपघात हे फक्त वाहन चालवणारा वाहनधारकच थांबवू शकतो. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाने वाहतूक ...

Traffic rules are for your safety, follow them | वाहतूक नियम आपल्या सुरक्षेसाठी आहेत, त्याचे पालन करा

वाहतूक नियम आपल्या सुरक्षेसाठी आहेत, त्याचे पालन करा

हुपरी : दररोज होणारे विविध प्रकारचे रस्ते अपघात हे फक्त वाहन चालवणारा वाहनधारकच थांबवू शकतो. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाने वाहतूक नियमांची पायमल्ली न करता जे नियम आपल्या सुरक्षेसाठी केले आहेत त्याची प्रामाणिकपणे व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन वाहतूक निरीक्षक(आरटीओ)प्रदीप शिंगारे यांनी केले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन, सुमन साळी महिला व बालविकास संस्था व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या सयुंक्त विद्यमाने रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त समारंभात ते मार्गदर्शन करीत होते.

आरोग्य केंद्राचे कर्मचारी, रुग्णवाहिका ड्रायव्हर, ग्रामपंचायत कर्मचारी, विद्युत कर्मचारी, पत्रकार, औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी यांना रस्ता सुरक्षा दूत या नावाने हेल्मेट देऊन या सर्वांना गौरवण्यात आले. यावेळी सुमन साळी महिला व बालकल्याण संस्था अध्यक्ष व डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या विश्वस्त प्रतिभा प्रदीप शिंगारे यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहन वेग कमी करा, पण आपल्यातील चांगुलपणाचा वेग वाढवून चांगल्या समाज निर्मितीच्या व राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हा, असे आवाहन केले. यावेळी शिवशाहीर राजू राऊत यांनी रस्ता सुरक्षा जनजागृतीबाबतचा पोवाडा सादर केला. सरपंच विजय माळी, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल नानिवडेकर, सचिव रघुवीर सिंह राठोड, मुख्याध्यापक गंगापूरकर, बाळासो चोपडे, सचिन मेथे, सर्जेराव वाघे, सागर बोंद्रे, रणजित खोत, आदी उपस्थित होते.

२९ रेंदाळ रस्ता सुरक्षा

फोटो ओळी- प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे आयोजित रस्ता सुरक्षा अभियान समारंभात रस्ता सुरक्षा दूत यांना हेल्मेट वितरित करण्यात आले. यावेळी वाहतूक निरीक्षक प्रदीप शिंगारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, प्रतिभा शिंगारे, सरपंच विजय माळी, आदी उपस्थित होते.

Web Title: Traffic rules are for your safety, follow them