शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजारामपुरीत ‘ट्रॅफिक’चा फलक हटविला

By admin | Updated: April 6, 2015 01:13 IST

कृती समिती आक्रमक : ९ नंबर शाळेचे पटांगण शहर वाहतूकच्या कार्यालयास न देण्यावर ठाम; आजचा कार्यक्रम उधळणार

कोल्हापूर : राजारामपुरीतील शाळा क्रमांक ९ येथे शहर वाहतूक शाखेचे कार्यालय स्थलांतरास शाळा व मैदान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी विरोधाचा जोर वाढविला असून रविवारी सकाळी शाळेच्या इमारतीवर ‘शहर पोलीस वाहतूक शाखा’ असा लावलेला फलक कार्यकर्त्यांनी हटविला. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आज, सोमवारी सकाळी कार्यालयाचा नियोजित उद्घाटन समारंभ हाणून पाडण्याचा निर्धार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. शाळा क्रमांक ९ ही गेली काही वर्षे बंद आहे. शाळेच्या दहा खोल्या व मोठे मैदान पडूनच आहे. त्याचा वापर परिसरातील दुकाने व व्यावसायिकांकडून पार्किंगसाठी केला जातो. मैदानाचीही मोठी पडझड झाली आहे. शाळेच्या तीन खोल्या ‘ट्रॅफिक पोलीस’ वापरणार आहेत. पडझड झालेल्या खोल्यांची पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्ती केली आहे. शनिवारी सायंकाळी शाळेचे नाव असलेल्या जागी शहर वाहतूक शाखेचा फलक लावला. तो फलक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी खोडून काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. आंदोलनात नगरसेवक मुरलीधर जाधव, वसंत कोगेकर, बाबा इंदुलकर, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंग्रस, आदी परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले. जयंती नाल्यातून पंचगंगेत मिसळणारे पाणी रोखण्यासाठी जयंती पुलावर ४५० अश्वशक्तीच्या पाणी उपसा केंद्राची उभारणी केली जाणार आहे. या उपसा केंद्रातून पाणी कसबा बावडा येथील प्रक्रिया केंद्रात नेण्यात येणार आहे. जयंती नाल्यावर विजेची उपकरणे, जनरेटर मीटर रूम, पॅनल रूम, ११ के.व्ही. क्षमतेच्या उच्चदाब विद्युत सबस्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या जयंती नाल्याशेजारी असणारी सर्व जागा महापालिक ा वापरात आणणार आहे. त्यामुळे महापालिकेने ‘ट्रॅफिक’साठी राजारामपुरीतील शाळा क्रमांक ९ येथील जागा प्रस्तावित केली आहे. नागरिकांच्या विरोधामुळे वाहतूक शाखेचे कार्यालय हलविण्यास विलंब झाल्यास एसटीपी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास तितकाच कालावधी पुढे जाणार असल्याचे महापालिका सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)