शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Kolhapur: पावसामुळे रांगणा किल्ल्यावर गेलेले पर्यटक अडकले, पहाटे सुरक्षित स्थळी आणण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 12:05 IST

शिवाजी सावंत गारगोटी : रांगणा किल्ला पाहण्यासाठी गेलेले सतरा पर्यटक पावसामुळे किल्ल्याच्या परिसरात अडकून पडले. त्यांना अंतुर्ली (ता.भुदर गड ...

शिवाजी सावंतगारगोटी : रांगणा किल्ला पाहण्यासाठी गेलेले सतरा पर्यटक पावसामुळे किल्ल्याच्या परिसरात अडकून पडले. त्यांना अंतुर्ली (ता.भुदरगड)चे सरपंच रामदास देसाई आणि शिवाज्ञा गडकोट समितीच्या सदस्यांना पहाटे सुरक्षित स्थळी आणण्यात यश आले.काल, मंगळवारी (दि.१८) रांगणा किल्ला पाहण्यासाठी कागल आणि इचलकरंजी येथील काही हौशी पर्यटक गेले होते. किल्ला पाहून रात्री परतत होते. पण दिवसभर जोरदार पाऊस सुरू असल्याने ओढ्याना पाणी आले होते. ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ते पलीकडे येऊ शकत नव्हते. त्यांच्यातील एक सदस्य लवकर आल्याने तो अलीकडे आला होता. रात्री अंधार पडला तरी ते आले नसल्याने नातेवाईकांची चिंता वाढली. त्यांनी याची खबर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना दिली. पोलिसांनी तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी रेस्क्यु टीमला पाचारण केले.तत्पूर्वी तहसीलदार अडसूळ यांनी अंतुर्लीचे सरपंच रामदास देसाई यांना त्या ओढ्याजवळ जाऊन रेसक्यू टीम येईपर्यंत कोणालाही अलीकडे येऊ देऊ नका असे सांगितले. एव्हाना रात्रीचे दीड वाजले होते. सरपंच देसाई यांनी पोलिस पाटील बाबाजी देसाई, शिवाज्ञा गडकोट समितीचे सदस्य सचीन देसाई (सर्वजण अंतुर्ली) गुरुनाथ वास्कर (शिवडाव), प्रकाश परब (तांब्याचीवाडी) यांना सोबत घेऊन मार्गक्रमण सुरू केले. त्यांना थोडे अंतर गेल्यावर ओढ्याच्या पलीकडे पर्यटक दिसले. पावसाचा जोर ओसरल्याने ओढ्याचे पाणी कमी झाले होते. पहाटे पाचच्या सुमारास सर्व सतरा पर्यटकांना सुखरूप सुरक्षित स्थळी आणले. यामध्ये एका महिलेचा समावेश होता.एव्हाना रिस्क्यु टीम, पोलिस कर्मचारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य ही सर्व मंडळी पोहचली होती. यावेळी कागलचे नगरसेवक कुमार पिस्ते हे कागलमधील नागरिकांना घेण्यासाठी त्यांच्या सहक-यांसह तेथे आले होते. सोशल मीडियावर रेस्क्यु टीमचे व शिवाज्ञा गडकोट समितीच्या सदस्याचे कौतुक होत आहे. भुदरगडच्या तहसिलदार अश्विनी अडसूळ यांनी पर्यटकांनी कोणतीही जोखीम घेऊ नये असे आवाहन केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडRainपाऊस