शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटक, भाविकांनी जोतिबा, अंबाबाई मंदिरांत जाणे टाळावे: जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:56 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक, भाविकांनी जोतिबा, अंबाबाई मंदिर, नृसिंहवाडी, संत बाळूमामा मंदिर या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले. उद्याने, गड, किल्ले या ठिकाणी सामूहिक सहली काढू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देपर्यटक, भाविकांनी जोतिबा, अंबाबाई मंदिरांत जाणे टाळावेजिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन

कोल्हापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक, भाविकांनी जोतिबा, अंबाबाई मंदिर, नृसिंहवाडी, संत बाळूमामा मंदिर या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले. उद्याने, गड, किल्ले या ठिकाणी सामूहिक सहली काढू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक, भाविक व पर्यटकांनी जिल्ह्यातील अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, सद्गुरू बाळूमामा मंदिर, नृसिंहवाडी अशा मोठ्या मंदिरांमध्ये दर्शनास जाणे काही काळ टाळावे.

जिल्ह्यातील मनोरंजनाच्या विविध ठिकाणी जसे सिनेमागृह, नाट्यगृह, वॉटर पार्क, बगीचे, जलतरण तलाव, किल्ले, इत्यादी ठिकाणीही नागरिकांनी जाऊ नये; सहली काढू नयेत; त्या ठिकाणी गर्दी करू नये. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये निवेदन देण्यासाठी समूहाने येऊ नये. त्याचबरोबर निवेदन विनंती-अर्ज, इत्यादी टपालाद्वारे पाठवावेत अथवा एखाद्या व्यक्तीने येऊन द्यावे.

ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद राहतील; परंतु सर्व शाळांतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, इतर कर्मचारी यांनी मात्र शाळेत, कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे.ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक यांना गावपातळीवर सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, ‘आशा’ वर्कर्स यांना घराघरांत जाऊन कोरोनासंदर्भात जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, कोरोनाच्या जनजागृतीसाठी एक लाख ७५ हजार हस्तपत्रिका छापून त्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर आठ हजार ६०० स्टिकर्स व पोस्टर्स व ५० होर्डिंगही शहरात लावण्यात आली आहेत.जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथकेजिल्ह्यातील धान्य व डिझेल साठ्यांसंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंची जादा दरांनी विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन, वैधमापन विभाग, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची पथके तयार करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोनाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर