‘हॉटेल टुरिस्ट’चा उद्या ‘सुवर्णमहोत्सव’

By Admin | Updated: February 19, 2015 23:47 IST2015-02-19T22:42:29+5:302015-02-19T23:47:57+5:30

कोल्हापुरात प्रथम हॉटेल व्यवसायाची मुहूर्तमेढ : ज्ञानेश्वर मुळे, मीनल मोहाडीकर यांची उपस्थिती

Tomorrow's 'Golden Morning Festival' of Hotel Turist | ‘हॉटेल टुरिस्ट’चा उद्या ‘सुवर्णमहोत्सव’

‘हॉटेल टुरिस्ट’चा उद्या ‘सुवर्णमहोत्सव’

कोल्हापूर : पन्नास वर्षांपूर्वी कोल्हापुरात सर्वांत प्रथम हॉटेल व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ‘हॉटेल टुरिस्ट’चा सुवर्णमहोत्सवी सोहळा शनिवारी (दि. २१) होत आहे. हॉटेलच्या ‘कोर्ट यार्ड’ सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या समारंभास अमेरिकेतील भारताचे राजदूत ज्ञानेश्वर मुळे व महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर हे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ‘टुरिस्ट’चे व्यवस्थापकीय संचालक बाळ पाटणकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.राजघराण्याचा वारसा असूनही अजितसिंह पाटणकर यांनी १९६४ साली ‘हॉटेल टुरिस्ट’ची मुहूर्तमेढ रोवली. व्यावसायिक कौशल्य, नावीन्य व बदलत्या जीवनशैलीची जोड देत बाळ पाटणकर त्यांच्यासोबत आता सिद्धार्थ व नकुल पाटणकर यांनी ‘टुरिस्ट’ची पर्यटक जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या ५० वर्षांत कोल्हापुरातील बदललेल्या हॉटेल व पर्यटन व्यवसायाची झलक दाखविणाऱ्या ‘सुवर्ण स्मरण’ या स्मरणिकेचे प्रकाशन ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार आहे. हॉटेल टुरिस्टची पन्नाशीनंतरची ही ‘इनिंग’ अशीच दमदार व कोल्हापूरच्या पर्यटनास वेगळ्या उंचीवर नेणारी असेल, असा विश्वास बाळ पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ‘टुरिस्ट’चे संचालक सिद्धार्थ पाटणकर, नकुल पाटणकर, सरव्यवस्थापक रमेश शिंदे, राम देशपांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Tomorrow's 'Golden Morning Festival' of Hotel Turist