शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्यावर सरकारची करडी नजर

By admin | Updated: May 10, 2015 01:13 IST

महापालिकेकडून सर्व्हे : वाहनांचे व्हिडिओ सर्वेक्षण, ५० कॅमेऱ्यांद्वारे होतेय मोजदाद; खास सॉफ्टवेअरचा वापर

कोल्हापूर : महिनाअखेरीस शहरातील टोल रद्द करून ‘आयआरबी’ला कायमचा निरोप दिला जाणार आहे. नंतर ही कंपनी अव्वाच्या सव्वा रकमेवर अडून बसू नये, म्हणून टोलनाक्यावर गोळा होणाऱ्या पैशांचा हिशेब लागला पाहिजे म्हणून राज्य सरकारने नऊ टोलनाक्यांवर ५० हून अधिक व्हिडिओ कॅमरे बसवून सर्वेक्षण सुरू केले आहे. तसेच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानेही आपले शंभर कर्मचारी चोवीस तास नाक्यावर बसवून वाहनांच्या नोंदी घेण्याचे तसेच अभियंत्यामार्फत ‘आयआरबी’ने केलेल्या कामांचे स्वतंत्रपणे मूल्यांकन सुरू केले आहे. गेली चार ते साडेचार वर्षे कोल्हापूरच्या जनतेने टोल रद्द झाला पाहिजे म्हणून आंदोलन केले असून, त्याला यश आले आहे. कोल्हापूरचा टोल ३१ मेच्या रात्रीपासून रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे २५ मे दरम्यान राज्य सरकार, रस्ते विकास महामंडळ, महानगरपालिका, आयआरबी यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत आयआरबीला किती कोटी रुपये द्यायचे याचा निर्णय होणार आहे. नंतर आयआरबी अवाजवी रक्कम सांगण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरून राज्य रस्ते विकास महामंडळाने संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने रस्त्यांच्या मूल्यांकनाचे काम हाती घेतले आहे. या घटनांवरून टोल रद्द होण्याच्यादृष्टीने सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे दिसते. (प्रतिनिधी)