शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयात आज टोलची सुनावणी

By admin | Updated: February 23, 2015 00:32 IST

शासनाच्या भूमिकेकडे लक्ष : याचिकेबाबत होणार निर्णय

कोल्हापूर : शहरातील वादग्रस्त टोल रद्द करा, या मागणीसाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज, सोमवारी ११ वाजता सुनावणी होत आहे. न्यायमूर्ती मदन लोकरे व यू. आर. लळित यांचे खंडपीठ ही याचिका दाखल करून घ्यायची किंवा नाही याबाबत निर्णय घेणार आहे. कृती समितीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ शेखर नाफडे, अभय नेवगी व कृष्ण कुमार हे काम पाहणार आहेत. राज्य शासन टोलबाबत कोणती भूमिका मांडणार, याबाबत शहरवासीयांत उत्सुकता आहे.शहरात राबविण्यात आलेला एकात्मिक रस्ते प्रकल्प अपूर्ण आहे. तरीही बेकायदेशीरपणे टोलवसुली सुरू आहे. हा जाचक टोल रद्द करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने २० जानेवारी २०१४ रोजी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी होत आहे. याप्रश्नी लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत सर्वाेच्च न्यायालयास वाटल्यास याचिका दाखल करून घेतली जाईल व पुढील सुनावणीच्या तारखा दिल्या जातील. न्यायालयास तथ्य न वाटल्यास याचिका फेटाळली जाईल. आयआरबी कंपनीनेही ‘आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय एकतर्फी निकाल देऊ नये,’ असे ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचे भविष्य आजच्या सुनावणीवर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयात टोलविरोधात ताकदीने बाजू मांडणार असल्याचे अ‍ॅड. अभय नेवगी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आयआरबीने केलेला त्रिपक्षीय कराराचा भंग व त्यातील त्रुटी, ‘आयआरबी’ला जाहीर निविदा न काढता ९९ वर्षांसाठी कवडीमोलाने दिलेली तीन लाख चौरस मीटरची जागा, टोलसाठी जनतेचा असणारा विरोध, अपूर्ण प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, युटिलिटी शिफ्टिंग न केल्याने निर्माण झालेल्या अडचणी, आदी मुद्दे कृती समितीतर्फे न्यायालयात मांडले जाणार आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाने टोलसाठी सर्वाेच्च न्यायालयात विधिज्ञ देण्याची तसदीही घेतलेली नाही. यापूर्वी कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या शासनाने टोलच्या बाजूने उच्च न्यायालयात बाजू मांडली होती. आता सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपचे शासन टोलबाबत सर्वोच्च न्यायालयात कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.(प्रतिनिधी)महापालिकेने तसदी घेतली नाहीमहापालिका प्रशासनाने यापूर्वी उच्च न्यायालयात प्रकल्प अपूर्ण असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले होते. आता सर्वोच्च न्यायालयात कृती समिती लढा देत आहे. अशा वेळी महापालिकेने ज्येष्ठ विधिज्ञ नेमणे गरजेचे होते. मात्र, महापालिकेने कसलीही तसदी घेतलेली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.