समीरच्या ब्रेन मॅपिंगची आज सुनावणी

By Admin | Updated: October 3, 2015 01:22 IST2015-10-03T01:22:08+5:302015-10-03T01:22:08+5:30

गोविंद पानसरे हत्या प्रकरण

Today's hearing of Sameer's brain mapping | समीरच्या ब्रेन मॅपिंगची आज सुनावणी

समीरच्या ब्रेन मॅपिंगची आज सुनावणी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग तपासणीवर आज, शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्यासमोर सुनावणी होत आहे.
तपासकामात समीर गायकवाड हा सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज न्यायालयाकडे सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी केला होता. आरोपीच्या वकिलांनी समीरच्या ब्रेन मॅपिंग तपासणीसाठी सरकारी वकिलांनी केलेल्या अर्जावर
आक्षेप घेतला. समीरला एकच दिवसापूर्वी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तूर्त त्याची मानसिकता
व्यवस्थित होणे अद्याप शक्य नाही; त्यामुळे लगेच बे्रन मॅपिंग तपासणी करणे सयुक्तिक होणार नाही. त्यामुळे बे्रन मॅपिंग तपासणीच्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी आठवड्याची मुदत द्यावी, अशी मागणी आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली. ही वाढीव मुदतीची मागणी खोडताना सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी, कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास गतीने सुरू आहे.
तपासाला दिशाही गतीने मिळाली आहे. या
तपासकामात खंड पडू नये यासाठी ब्रेन मॅपिंगची तपासणी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद मांडला. ब्रेन मॅपिंग तपासणीवर निर्णय उशिरा घेतल्यास गतीने सुरू असणाऱ्या तपास कामात खंड पडण्याची शक्यता आहे. म्हणून लवकरात लवकर ब्रेन मॅपिंगची तपासणी करण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी केली होती. यावेळी दोन्हीही बाजंूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश डांगे यांनी आज, शनिवारी पुढील सुनावणी ठेवली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's hearing of Sameer's brain mapping